तेल्हारा येथे भूमापन दिन.
माहीती व समाधान शिबिर.

तेल्हारा दि. –
भूमापन दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय परीसरात भूमि अभिलेख विभागामध्ये सुरु असलेल्या नाविण्य पूर्ण योजने बद्दल जनतेला माहीती व्हावी या उद्देशातून माहीती व समाधान शिबिर उप अधिक्षक भूमि अभिलेख तेल्हारा कार्यालयाकडून आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक लोकांनी समाधान व्यक्त केले. भारती खंडेलवाल जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अकोला यांचे मार्गदर्शन खाली तसेच विवेक बिहाडे उप अधिक्षक भूमि अभिलेख तेल्हारा यांनी मोजणी विषयी, स्वामित्व योजने विषयी माहीती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लिना खारोडे मुख्यालय सहाय्यक, मिलिंद बोदडे निमतानदार, राजेश घोगले शिरस्तेदार, संजय हराळे भूमापक, सुरेश वर्धे, संतोष धुर्वे, सुबोध पळसपगार, सै.जिलानी सै.अमीर यांनी प्रयत्न केले.