नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव अकोला मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. माजी विद्यार्थी तेल्हारा शहरातील प्रसिद्ध प्रेरणा इमरजन्सी हाॅस्पीटल चे युवा डाॅक्टर सुप्रित कराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव अकोला मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. माजी विद्यार्थी तेल्हारा शहरातील प्रसिद्ध प्रेरणा इमरजन्सी हाॅस्पीटल चे युवा डाॅक्टर सुप्रित कराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव अकोला मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
माजी विद्यार्थी तेल्हारा शहरातील प्रसिद्ध प्रेरणा इमरजन्सी हाॅस्पीटल चे युवा डाॅक्टर सुप्रित कराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव अकोला मध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला ध्वजारोहण करण्यासाठी शाळेचे सन 2008 चे माजी विद्यार्थी राहीलेले तेल्हारा शहरातील प्रसिद्ध प्रेरणा इमरजन्सी हाॅस्पीटल चे संचालक युवा डॉक्टर सुप्रित कराळे यांना बहूमान देण्यात आला. एका युवा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण केला ही उलेखनीय बाब आहे.

या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने नॅशनल मिलिटरी स्कूल चे अध्यक्षा श्रीमती गणगणे मॅडम, प्रमुख विशेष अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तेल्हारा येथील प्रेरणा इमर्जन्सी हाॅस्पीटलचे संचालक डॉ सुप्रित प्रेरणा सुहासराव कराळे उपस्थित होते तसेच प्राचार्य मॅडम,पर्यवेक्षक पवार सर, खेरडे सर हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.
नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव येथे आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्याला सर्वप्रथम अतिथी पाहूण्याचे उपस्थितीत विद्यार्थ्यांची ग्राऊंडवर परेड ओळख झाली. विशेष अतिथी डॉ सुप्रित कराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून राष्ट्रीय ध्वज तिरंग्याला सलामी देण्यात आली एका माजी विद्यार्थी यांचे हस्ते ध्वजारोहण व सलामी हि बाब उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी दिसून आली. यावेळी राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले व सर्व अतिथींचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला गित गायन सादर केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची मांडणी नियोजन व्यवस्था नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव च्या शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी केली.