शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये खोटरे विघालयाचे राजेश तेलगोटे सर जिल्ह्यातून प्रथम.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सन 2023 यांच्यामार्फत शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई – साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण प्रशिक्षण स्तरावरील शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापक यांच्यासाठी राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरसोली, तालुका तेल्हारा जिल्हा अकोला तेथे कार्यरत असलेले शिक्षक राजेश काशिराम तेलगोटे सर यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला होता. या स्पर्धेमध्ये राजेश काशीराम तेलगोटे सर यांनी इयत्ता 9 ते 10 या गटातून भाषा विभागातून सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे बक्षीस व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम दिनांक 29/03/2025 रोजी बाबासाहेब धाबेकर उर्दू अध्यापक विद्यालय अकोला येथे पार पडला. डाएटच्या प्राचार्य श्रीमती रत्नमाला खडके मॅडम यांच्या हस्ते राजेश काशिराम तेलगोटे सर यांचा प्रमाणपत्र आणि मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद खोटरे सर, संस्थेचे अध्यक्ष सुरेशदादा खोटरे, सचिव माजी आमदार वसंतराव दादा खोटरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.