आय टी आय तेल्हारा येथे जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात.
वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा निच्छय करून साजरा.
आय टी आय तेल्हारा येथे जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात.
वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा निच्छय करून साजरा.

खेल मंत्रालय भारत सरकार,
मेरा युवा भारत, अकोला अभियान अंतर्गत विवेकानंद युवा बहुदेशीय मंडळ, पाथर्डी यांच्या वतीने आय टी आय, तेल्हारा येथे जागतिक युवा कौशल्य दिन वृक्षारोपण व संवर्धन करून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआय तेल्हारा चे प्राचार्य एस एस उईके होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार प्रशांत विखे होते. व्यासपीठावर शिल्प निदेशक देवेंद्र वसतकार,गोपाल गावंडे,एस एस गुजर, ऐ पी राऊत,ऐ एम मनसटे यांची उपस्थिती लाभली होती.
प्रमुख मार्गदर्शक पत्रकार विखे यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर कौशल्याच्या साथीने यश संपादन करून उद्याचे उद्योजक बना असा मर्मिक सल्ला आपल्या मार्गदर्शनात दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे अध्यक्ष प्रदीप राऊत यांनी केले. सूत्रसंचालन शिल्प निदेशक देवेंद्र वसतकार यांनी तर आभार प्रदर्शक प्रा. सचिन थाटे यांनी केले .
दरम्यान आय टी आय च्या परिसरा मध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आता.
आयटीआयचे विद्यार्थी व सर्व कर्मचारी व युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे सदस्य,आयटीआयचे शिल्प निर्देशक एस डब्ल्यू मानकर, एस जी राऊत,एस डाबेराव यांनी परिश्रम घेतले.