वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा चे गाव तिथे शाखा अभियान.
संविधान चळवळीत युवकांनी पुढे यायचे युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोड यांनी केले आवाहन.
वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा चे गाव तिथे शाखा अभियान.
संविधान चळवळीत युवकांनी पुढे यायचे युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोड यांनी केले आवाहन.

तेल्हारा तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडी ची प्रत्येक जी. प.सर्कल नुसार बांधणी झालेली असून गाव तिथे शाखा अभियानाला नुकतीच सुरूवात करण्यात आलेली आहे. या अभियान अंतर्गत दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी ५ शाखेंचे घोडेगाव, पाथर्डी, टाकळी, भांबेरी, खेल देशपांडे येथे नाम फलकाचे अनावरण वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे. युवा आघाडीच्या या अभियान मध्ये प्रत्येक जाती समूहातील युवकांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळत आहे.
दरम्यान तेल्हारा येथील विश्राम गृह येथे या संबंधित बैठक पार पडली. यावेळी राजेंद्र पातोडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले, देशात ज्याप्रमाणे संविधानाशी खेळून सर्वसामान्यांचे हक्क हिरवण्याचे प्रयत्न होत ते थांबविण्यासाठी युवकांनी पुढे यायचे आहे, त्याला युवकच उत्तर देऊ शकतात करीता युवकांनी समोर येण्याची गरज आहे असे सांगितले गेले तसेच आजपर्यंत जेवढ्या क्रांती झाल्या त्या युवकांनीच केल्या आहेत असे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक युवकांनी डोक्यावर घेउन जिंकायचे महासचिव राजकुमार दामोदर यांनी सांगितले,वंचित बहुजन युवा आघाडी नेहमी नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या, निराधारांच्या न्यायासाठी आवाज उठवत असते करिता ज्या युवकांना समाजासाठी काही करावेसे वाटते त्यांनी जरूर जुळावे असे आवाहन तालुका अध्यक्ष झिया अहमद शाह यांनी केले आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वानखडे, नकुल काटे, सचिन शिराळे, जय तायडे, तालुका अध्यक्ष झिया शाह महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंत इंगळे सह तालुक्यातील बहुसंख्येने आलेले पदाधिकारी उपस्थित होते.