दास्तान कादंबरीला एकशे पस्तीसावा केशव मेश्राम पुरस्कार.
प्रतिमा इंगोले यांची कांदबरी.
प्रतिमा इंगोले यांच्या सातव्या कादंबरी ‘दास्तान’ ला जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळ नागपूर यांचा प्रा.केशव मेश्राम राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
ह्या पुरस्काराचे वितरण ता.३०.३.२०२५ला नागपूर येथे होणार आहे.दास्तान कादंबरी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रकाशित झालेली, हिंदू-मुस्लिम संघर्ष आणि ऐक्य यावरील प्रातिनिधिक कादंबरी आहे. प्रा.केशव मेश्राम यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल प्रतिमा इंगोले यांना आपल्या लेखनीचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे. कै.केशव मेश्राम यांनी पुण्यात, त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व.श्या.कु.ढाकरे उर्फ बापूसाहेब ढाकरे ह्यांच्या कविते मुळे घडलो त्यामुळे मी कवितेचा चाहता झालो,आणि कविता लेखनाकडे वळलो,असे उद्गार काढले होते. त्यांचे गुरुजी स्व.श्यामराव कुकाजी ढाकरे उर्फ बापूसाहेब ढाकरे ह्यांच्या कवितेचे चाहते होते. ते त्यांना नेहमी शाळेत बोलावून कविता गायन करायला लावीत असे प्रतिमा इंगोले यांनी सांगितले आहे. आज त्यामुळे त्यांच्या नावाचा हा पुरस्कार प्रतिमा इंगोले यांनी खूप मौलिक वाटतो आहे असे ही त्या म्हणाल्या आहेत.