आपला जिल्हा

हनुमान सागर वान प्रकल्प हाप सेन्चूरी – 50%

हनुमान सागर जलसाठ्यात झपाट्याने होत असलेल्या वाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा.

हनुमान सागर वान प्रकल्प हाप सेन्चूरी – 50%
हनुमान सागर जलसाठ्यात झपाट्याने होत असलेल्या वाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा.

गत चार पाच दिवसापासून हनुमान सागर वान प्रकल्प वान नदी विस्तृत सातपुडा पर्वत रांगेत सुरू असलेल्या पावसाने वान प्रकल्प हनुमान सागर वान धरणाच्या पातडीत 17 टक्क्यांनी वाढ झाली असून जलसाठ्याने हाप सेन्चूरी पूर्ण केली आहे. सध्या या धरणात एकुण 50 टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती वान प्रकल्प अधिकारी नयन लोणारे यांनी दिली आहे.

तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर , वान प्रकल्पात 50% जलसाठा झाल्या मुळे यावर्षी सुद्धा सदरहू धरण भरणार असल्याचे संकेत दिसत आहेत.


अकोला, अमरावती, बुलढाणा, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प” हे धरण आहे. ह्या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील 53 गावचा शेत शिवार लाभक्षेत्रात येतो आणि अनेक शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून याच धरणाच्या जलाशयावर अवलंबून असते. ह्या जलसाठ्याच्या पाण्यावर सिंचनातून हजारो हेक्टर सिंचनाचे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होत असते परिणामी परिसरात या धरण साठ्या कडे जनतेच्या नजरा लागलेल्या असतात. परिसरातील जनता वान प्रकल्पाला “वरदान प्रकल्प” म्हणून संबोधते. या धरणाची विशेषता म्हणजे एखादा अपवाद वगळता हे धरण दरवर्षी शंभर टक्के पूर्ण भरते.
यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या धरणात मागील वर्षीचा 32 टक्के जलसाठा शिल्लक होता.या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच सातपुडा पर्वतातील मेळघाट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला म्हणजे हे धरण झपाट्याने भरते. हे धरण 100 टक्के केव्हा होते याकडे लाभधारक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असतात. हनुमान सागर मधून निघालेल्या कालव्यां द्वारे परिसरातील हजारो एकर शेती सिंचन केल्या जाते. हनुमान सागरातून निघालेल्या कालव्याद्वारे शेतकरी गहू, हरभरा,भुईमुग व उन्हाळी मूग इतर बरेच पिके घेतात.
वारी परिसरात सुरू असलेल्या पावसाने धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!