पान पिंपरी औषधी पिकांच्या समस्यांबाबत उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ह्यांची घेतली भेट.
पान पिंपरी औषधी पिकांच्या समस्यांबाबत उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ह्यांची घेतली भेट.

विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ ह्या जिल्ह्यातील पानपिपरी, मुसळी ह्या वन औषधी व केळी, संत्रा, कपाशी, व इतरही पिकाच्या लागवड धारक शेतकऱ्यांना नेहमी सतत भेडसावत असलेल्या समस्यांबाबत निराकरण करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या असलेल्या समस्यांबाबत निराकरण होऊन त्या दृष्ठिने आगामी काळात उपाययोजना करावी व शासनाकडून थोडा फार आधार मिळावा ह्यासाठी जिल्हा नियोजन भवन अमरावती येथे ना. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ह्यांचे अध्यक्षतेंखाली बैठक झाली यावेळी जिल्हा कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, खासदार, आमदार, व सर्व कृषी विभागाचे अधिकारी ह्यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून आलेल्या शेतकऱ्यांच्या सतत भेडसावत असलेल्या समस्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ह्यांनी स्वतः एकुण घेतल्या ह्यामध्ये विभागीय समिती सदस्य,व नागार्जुना पान पिपरी उत्पादक संस्थेचे संचालक शेतकरी मनोहर मुरकुटे ह्यांनी कृषी मंत्री कोकाटे, कृषी सहसंचालक ह्यांना पान पिंपरी ह्या पिकांबाबत सतत भेडसावत असलेल्या समस्यानबाबत सांगून तसें लेखी पत्र सुद्धा सादर केले.

निवेदनात पान पिपरी, मुसळी पिकाची पीक विम्यात तरतूद, सन २०१७ – १८ पासूनचे प्रलंबित अनुदान पूर्ववत सुरु करावे. ,सदरचे पान पिपरी पिकाला मनरेगा मार्फत अनुदान देण्यात येते परंतु मनरेगा अंतर्गत मिळणारे अनुदान हे ग्रामीण भागातील जॉब कार्ड धारकांना मिळते. ९९% पान पिपरी उत्पादक शेतकरी हे शहरी भागातील रहिवासी असल्याने ह्यांना ह्याचा कोणताही उपयोग होत नाही ह्यासाठी ह्यामधील जॉब कार्डची अट शिथिल करावी अन्यथा वेगळा पर्याय द्यावा , सदरचे पीक खर्चिक असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत योग्य भाव मिळावा ह्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, सततच्या येणाऱ्या रोगावर उपाय योजना करण्यासाठी अंजनगाव सुर्जी येथे संशोधन केंद्र उभारावे, लागवडीसाठी पीककर्जाची तरतूद, नवीन सुधारित वाणाची तरतूद व संशोधन प्रक्रिया, पान पिपरी पिकाशी निगडित प्रक्षेत्र भेटी व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गेली दोन वर्षापासून चे प्रलंबित ठिंबक, स्प्रिंकलर, पाईप चे अनुदान त्वरित मिळावे ई प्रमुख विषयांचे सविस्तर निवेदन दिले.
त्या अनुषंघाने विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लव्हाळे ह्यांनी आयुक्त कृषी आयुक्ततालय पुणे ह्यांचे कडे शेतकरी मनोहर मुरकुटे ह्यांनी लेखी सादर केलेल्या मागण्याची पूर्तता व्हावी ह्यासाठी प्रकल्प अहवाल माहितीस्तव पाठवण्यात आला असल्याचे सांगितले गेले. वरिष्ठ स्तरावर ह्याबाबात प्रशासन, शासन काय भूमिका घेणार ह्याकडे पान पिपरी, मुसळी उत्पादक शेकऱ्यांचे लक्ष लागले आहे.