आपला जिल्हा

सन्मान स्त्री कर्तुत्वाचा मध्ये डॉ. अंजली राहुल सदाफळे सन्मानित.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे आयोजन.

सन्मान स्त्री कर्तुत्वाचा मध्ये डॉ. अंजली राहुल सदाफळे सन्मानित.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे आयोजन.


तेल्हारा – दि.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 16 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला अंतर्गत पीसीपीएनडीटी विभाग अकोला तर्फे सन्मान स्त्री कर्तुत्वाचा या सदराखाली जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सौ. तरंगतुषार वारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.


आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अकोला येथील मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे ,मनपा अकोला आरोग्य अधिकारी डॉ. आशिष गिऱ्हे, डॉ. आशाताई मिरगे सामाजिक कार्यकर्ता स्त्रीरोग तज्ञ तसेच सर्व स्त्री रोग तज्ञ डॉ. सीमा तायडे ,डॉ.रेखा पाटील ,डॉ.वंदना बागडी आणि श्रीमती प्रतिभा अवचार सामाजिक कार्यकर्ता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


सन्मान स्त्री कर्तुत्वाचा या सदराखाली माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंगतुषार वारे मॅडम यांनी आरोग्य विभागातील विभाग विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला , त्यामध्ये तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक क्रमांक एक महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली राहुल सदाफळे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉक्टर अंजली राहुल सदाफळे या इसवी सन 2013 पासून तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा अंगणवाड्या यातील विद्यार्थी तपासून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय ,जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे उपचार व शस्त्रक्रिया करून घेतल्या. तसेच कोरोना सारख्या महामारी मध्ये ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नसताना त्यांनी प्रसूती विभाग अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला तसेच कोविड तपासणी आणि लसीकरण यामध्ये पण त्यांनी उत्तम कार्य केले. शाळा तपासणी दरम्यान किशोरवयीन मुलींना वयानुसार होणाऱ्या व्याधी विषयी तसेच ॲनिमिया मुक्त भारत आणि बेटी बचाव या सदराखाली मार्गदर्शन केले. तसेच 2023 पासून ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे गरोदर स्त्रियांसाठी सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यात आले त्यामध्ये गरोदर स्त्रियांची तपासणी करून त्यांना सोनोग्राफी करता संदर्भित केले हे कार्य त्यांचे आजपर्यंत ही सुरू आहे.

डॉ. अंजली सदाफळे यांनी केलेल्या कार्याची दखल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे मॅडम यांनी घेतली आणि त्यांना सन्मानित केले.त्यांच्या या कार्यामध्ये नेहमीच त्यांचे यजमान डॉ. राहुल सदाफळे वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय तेल्हारा यांची साथ मिळाली. डॉ.रामु नागे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा पर्यवेक्षक तसेच ग्रामीण रुग्णालय तेल्हाराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पेंदाम तसेच माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक तापडिया ,डॉ. अनिल मल्ल यांचे सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता शिरसाठ व सुकेशिनी शिरसाट पीएचएन तर आभार प्रदर्शन ॲड शुभांगी ठाकरे जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय यांनी केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!