एक पेड माॅ के नाम अंतर्गत वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना रोप वाटप.
हरितक्रांती सेना पथक,श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा चा उपक्रम.
एक पेड माॅ के नाम अंतर्गत वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना रोप वाटप.
हरितक्रांती सेना पथक,श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा चा उपक्रम.

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे हरित क्रांती सेना पथकाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम शाळेतील माता पालक यांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी एक पेड माॅ के नाम हे अभियान अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षरोप वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हि. डी. गावंडे हे होते तर अतिथी म्हणून सौ प्रेरणाताई कराळे मॅडम, शांतीकुमार सावरकर, सुनिल वंजारी, बी.जी.पवार, बळीराम कुवारे, अभिजित हिगणकर, भारत भोयर, अंकेश भांबुरकर, सौ शर्वरी हिंगणकर, कु प्रियंका नंदाने, धनंजय भंगाळे, तेजराव कडू, गजानन गावंडे उपस्थित होते. यावेळी हरित क्रांती सेना प्रमुख अंकेश भांबुरकर यांनी पर्यावरण विषयक माहिती दिली आहे. कार्यकमाचे सुत्रसंचालन कु राणी वानखडे हिने केले तर आभार प्रदर्शन श्रेयस उपाध्याय यांने केले .