वृक्षांच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून असते, पुंडकर गुरुजी.
श्री शंकरराव पुंडकर विद्यालय व क. महाविद्यालयात लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद यांची जयंती व विद्यालयाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण प्रसंग.
वृक्षांच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून असते, पुंडकर गुरुजी.
श्री शंकरराव पुंडकर विद्यालय व क. महाविद्यालयात लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद यांची जयंती व विद्यालयाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण प्रसंग.

आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वासाला लागणारा प्राणवायू आपल्याला वृक्षामुळेच मिळतो त्यामुळे मानवाचे अस्तित्व वृक्षावरच अवलंबून आहे असे प्रतिपादन श्री अंबिकादेवी ज्ञान प्रसारक मंडळ सौन्दळ्याचे अध्यक्ष शंकरराव पुंडकर गुरुजी यांनी केले.
सौन्दळा येथील श्री शंकरराव पुंडकर विद्यालय व क. महाविद्यालयात लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद यांची जयंती व विद्यालयाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात पुढे बोलतांना ते म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व मानवजातीचे पुढील भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. श्री शंकरराव पुंडकर विद्यालयात दरवर्षी 23 जुलैला वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात येते. आज या विद्यालयात दोनशे पेक्षा जास्त स्वदेशी झाडे मोठी झालेली आहेत. वृक्षामुळे या विद्यालयाचा परिसर प्रसन्न दिसतो व विद्यार्थ्यांना पक्षांचा अभ्यास करण्याची संधी सुद्धा मिळते. यावेळी विद्यालयात जवळपास 20 वृक्ष विध्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते लावण्यात आले व विद्यार्थ्यांना 80 वृक्षांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रमेश ठाकरे,सूत्रसंचालन महेंद्र कराळे तर आभार प्रदर्शन तुषार कोल्हे यांनी केले. यावेळी विलास घुंगड, राजेश टाले, शैलेश तराळे, प्रविण चांदुरकर, प्रा. मनिष गोरद, प्रा. पुरुषोत्तम गाढे, प्रा. ससाणे, अनंतराव पुंडकर, हरिभाऊ भिसे, रामदास सांगोळे, ज्ञानेश्वर मेतकर, विकास घोले इत्यादी उपस्थित होते.