आपला जिल्हा

15 सप्टेंबर पर्यंत ई पिक पाहणी नोंदणी करा. तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन.

15 सप्टेंबर पर्यंत ई पिक पाहणी नोंदणी करा. तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन.

15 सप्टेंबर पर्यंत ई पिक पाहणी नोंदणी करा.
तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन.

तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की शासनाच्या सूचनांनुसार ई-पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे.१५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी करून नोंदणी करावी. यानंतर पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना विविध शेतकरी कल्याणकारी योजना व अनुदानाचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात.

शेतकरी बांधवांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे समाधान सोनवणे तहसिलदार तेल्हारा यांनी आवाहन केले आहे.

ई-पीक पाहणी: –
सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणी म्हणजे शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवतात, जी त्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाते. ही प्रक्रिया करण्यासाठी एक विशेष ‘DCS mobile application’ वापरली जाते, जी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

या माहितीचा उपयोग पीक विमा, शासनाकडून मिळणारे अनुदान आणि इतर शेतीविषयक योजनांसाठी केला जातो, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होते.

ई-पीक पाहणी का महत्त्वाची आहे?
पिकांची नोंदणी:
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची अचूक माहिती सरकारकडे नोंदवता येते.

योजनांचा लाभ:
पीक विमा, अनुदान आणि इतर शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.
पारदर्शकता:
ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने अधिक पारदर्शक आणि सोपी होते.

ई-पीक पाहणी कशी करावी?
1. DCS mobile application डाउनलोड करा:
गुगल प्ले स्टोअरवरून DCS mobile application चे नवीनतम व्हर्जन डाउनलोड करा.
2. अॅप उघडा:
अॅप उघडा आणि ‘पीक माहिती नोंदवा’ या पर्यायावर क्लिक करा.
3. खाते आणि गट क्रमांक निवडा:
तुमचा खाते क्रमांक आणि गट क्रमांक निवडा.
4. क्षेत्र तपासा:
लागवडीखालील जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र आपोआप दिसून येईल.
5. हंगाम निवडा:
चालू खरीप हंगाम निवडा.
6. पिकाचा प्रकार निवडा:
तुम्ही एकच पीक लावले आहे की मिश्र पीक किंवा इतर काही, याची नोंद करा.
7. माहिती नोंदवा:
सर्व माहिती भरून पिकांची नोंदणी पूर्ण करा.

महत्वाचे मुद्दे:
शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ही शेतकऱ्यांनी स्वतः करायची असते.
शासनाकडून या प्रक्रियेसाठी ठराविक अंतिम मुदती दिल्या जातात, त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ही नोंदणी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!