आपला जिल्हा

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावरून दखल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांना जीवन गौरव पुरस्कार.

सर्वोत्कृष्ट बँक म्हणून बँकेलाही विभागीय स्तरावरील पुरस्कार.

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावरून दखल,
जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांना जीवन गौरव पुरस्कार.
सर्वोत्कृष्ट बँक म्हणून बँकेलाही विभागीय स्तरावरील पुरस्कार.

दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक लि अकोला यांनी 116 वर्षे अविरत सेवा दिली.तीन पिढ्यांपासून कोरपे परिवाराने सहकार चळवळ अधिक गतिमान केली असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागाचा आमूलाग्र विकास घडविला आहे. या भरीव यशाचे भगीरथ म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्याकडून दिला जाणारा तसेच राज्यस्तरील मोलाचा मानण्यात येणारा ‘कै. विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते स्विकारला आहे. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावती विभागातून सर्वोत्कृष्ट बँक ठरली असून, बँकेला देखील ‘कै. वैकुंठभाई मेहता’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. बुधवार, २३ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित भव्यदिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार स्विकारण्यात आले यावेळी अध्यक्ष डॉ संतोष दादा कोरपे,सहकार नेते रमेशराव हिंगणकर, शिरीष धोत्रे,हिदायत पटेल, तेल्हारा संचालक सौ रूपालीताई संदीप पाटील खारोडे,संदीप रमेशराव खारोडे,मीरसाहेब इत्यादी सह सर्व संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.


या दोन्ही पुरस्काराने बँकेच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले गेले आहेत. बँकेला उच्चतम दर्जा प्राप्त करून देण्यात अकोला, वाशीम जिल्ह्यातील बँकेचे ग्राहक, खातेदार, शेतकरी, शेतमजूर, हितचिंतक व वेळोवेळी बँकेच्या कार्याला आपल्या लेखणीतून प्रसिद्धी देणारे पत्रकार बंधू-भगिनी यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. संतोष कोरपे यांच्या या कार्याची दखल घेत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशनने त्यांची या दोन्ही पुरस्कारासाठी निवड केली आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!