आपला जिल्हा

तेल्हारा शहरातील नगर परिषद संदर्भातील विविध समस्यांना घेऊन आमरण उपोषण. शहरात दोन ठिकाणी उपोषण मंडप.

तेल्हारा शहरातील नगर परिषद संदर्भातील विविध समस्यांना घेऊन आमरण उपोषण. शहरात दोन ठिकाणी उपोषण मंडप.

तेल्हारा शहरातील नगर परिषद संदर्भातील विविध समस्यांना घेऊन आमरण उपोषण.
शहरात दोन ठिकाणी उपोषण मंडप.

तेल्हारा नगर परिषदे अंतर्गत विविध प्रकारच्या समस्या, मागण्याची दखल मुख्याधिकारी तेल्हारा यांच्या कडून न घेतल्याने येथील नरेंद्र सुईवाल यांनी न. प. कार्यालयासमोर ८ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे तर श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, महाराजा अग्रेसन चौकात नगर परिषद अंतर्गत विविध भागातील समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य पक्षाने सुद्धा बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

नरेश सुईवाल यांनी दिलेल्या मागण्यामध्ये नगर परिषद मालकीच्या दुकान गाड्याची चौकशी व्हावी, महात्मा फुले बाजारपेठेतील पहिल्या माळ्यावरील दूरसंचारच्या दुकानाची चौकशी व्हावी, अतिक्रमण मोहिमेंतर्गत पाडण्यात आलेल्या दुकाने पुनश्च चालविण्यास दिलेल्या प्रकरणाची चौकशी व्हावी, शेगाव नाका परिसरातील ५० ते ६० वर्षे जुनी झाडे अवैधरीत्या कत्तल करण्यात आली त्याची चौकशी व्हावी, अभ्यासिकेतील एसी मुख्याधिकारी यांनी लावल्या प्रकरणाची चौकशी व्हावी, १ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री नरेंद्र जिनिंगच्या मालकीच्या जागेमधील दुकाने तोडली त्याची चौकशी होऊन गुन्हे नोंदवून नुकसान भरपाई मिळावी, घरकुल योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी व्हावी, नगरपरिषद तेल्हारा यांनी रस्ते सौंदर्याकरणाच्या नावावर दालनात बांधकाम कामाची सूचना न देता वळण रस्त्यावर जे गिट्टी, मुरुम, रेती आदी साहित्य टाकल्याने नागरिकांना त्रास होत आहे याची चौकशी करणे, शहरातील रस्त्यांवरील खड्डे, शहरातील नालीवरील तुटलेले पूल ,नागरिकांना वेगवेगळ्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे आदींची चौकशी करुन न्याय मिळावा, असेही निवेदनात नमूद आहे. या निवेदनावर कार्यवाही न झाल्याने व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी दखल न घेतल्याने बेमुदत उपोषण सुरू केल्याचे नरेंद्र सुईवाल यांनी सांगितले आहे.

तसेच तेल्हारा शहरातील प्रलंबित मागण्यांसाठी स्वराज्य पक्षाचे सुद्धा बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि विविध नागरी समस्यांच्या निराकरणासाठी स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदे समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी शहरातील विविध भागांतील समस्या सोडवण्यासाठी एकूण १४ मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये योगेश्वर कॉलनीतील साचलेल्या पाण्याची विलेवाट लावून रस्त्यांची दुरुस्ती करणे, शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्ट्रीट पोलवरील बंद पडलेल्या लाइट्स दुरुस्त करून नवीन लाइट्स बसवणे, इंदिरानगरातील गोपाल बाबुळकर यांच्या घरापासून अपूर्ण असलेले रस्त्याचे काम पूर्ण करणे, स्वप्निल शेवाळे यांच्या घराजवळील बंद पडलेले नालीचे बांधकाम सुरू करणे, साईनगरातील उंबरकर कॉम्प्लेक्स ते गाळेगाव कमानपर्यंत अरुंद नालीचे रुंदीकरण करणे, गजानन नगरातील वाळके घर ते धान्यमार्केट ते साई मंदिरपर्यंत गटार पूर्ण करून नाली बांधकाम करणे, शेगाव नाका व संत तुकाराम महाराज चौकात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे, शहरात ठिकठिकाणी फुटलेल्या नाल्या आणि अयोग्य उतारामुळे साचलेल्या पाण्याची विलेवाट लावणे, हनुमान वाटिका जवळील प्रलंबित सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, क्रिडा संकुल जवळील टाउन हॉलची दुरुस्ती करून वापरात आणणे, मिलिंदनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह तत्काळ दुरुस्त करणे, प्रताप चौकातील बंद असलेला जलतरण तलाव दुरुस्त करून पुन्हा सुरू करणे आणि शाळेत जाणाऱ्या रस्त्यावरील त्रासदायक गटारी मुक्त करणे यांचा समावेश आहे.या आंदोलनात स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. या आंदोलनात स्वराज्य पक्षाचे गणेश आमले, प्रतिक पाथ्रिकर,अक्षय भुजबले,गोपाल खळसान,मयुर राऊत,शाम मोहे,सचिन गोरे,प्रज्वल लव्हाळे,पिंटु अंजनकार,राम सुरवार, यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!