तेल्हारा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मनोज राठी व सचिवपदी ॲड. संदीप वानखडे यांची निवड. निवडीचे सर्वत्र कौतुक.
तेल्हारा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मनोज राठी व सचिवपदी ॲड. संदीप वानखडे यांची निवड. निवडीचे सर्वत्र कौतुक.
तेल्हारा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मनोज राठी व सचिवपदी ॲड. संदीप वानखडे यांची निवड.
निवडीचे सर्वत्र कौतुक.

तेल्हारा वकील संघाच्या अध्यक्ष व सचिव पदासाठी निवडणूक आज दि. 15 सप्टेंबर ला घेण्यात आली. अध्यक्ष पदाकरिता ॲड. मनोज राठी व ॲड. रामेश्वर मनतकार या उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची व अटीतटीची लढत झाली.
त्यामध्ये ॲड. मनोज राठी यांनी ३१ मते घेऊन विजय प्राप्त केला तर त्यांचे प्रतिद्वंधी ॲड. रामेश्वर मनतकार यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले तसेच सचिव पदाकरिता ॲड संदीप वानखडे व ॲड. आकाश बुरघाटे यांच्यामध्ये थेट लढत झाली. त्यामध्ये ॲड.संदीप वानखडे यांचा एका मताने निसटता विजय झाला. सदरची निवडणूक ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व शांततामय पार पाडली.
सदर निवडणूक मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ वकिल ॲड. श्रीकृष्ण रहाणे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. अख्तर शाह यांनी कामकाज पाहिले. निवडणूक मध्ये विजय उमेदवार यांच्या विजयाचे शिल्पकार वकील संघाचे ज्येष्ठ वकील, ॲड. नरेश चौधरी, ॲड. विश्वासराव नेरकर, ॲड. कुलकर्णी, ॲड. मोहन दादा अहेरकर, ॲड मंगेश बोदडे, ॲड प्रकाश केसान, ॲड ज्योती राठी, ॲड डांगरा, ॲड प्रीती राठी, ॲड एनया कुलकर्णी, ॲड. मनोज ( पप्पू) राठी, ॲड. पवन शर्मा, अँड प्रकाश ववाकोडे, अॅड राऊत, ॲड गावंडे, ॲड. अतुल काकड, अँड अजय हागे, अँड भाकरे ,ॲड. सागर शर्मा, ॲड. नासीर शेख, ॲड. नितीन पाटील, ॲड. संदीप देशमुख, अँड गौतम वानखडे, ॲड मुन्ना रहाणे, ॲड. शिवदास सुशीर, ॲड. भूषण तायडे, ॲड. दानिश खान, यांनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती प्रसिद्धी व्दारे दिली आहे.