तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वंचित बहुजन आघाडी चा झेंडा, सभापती पदी वं ब आघाडी चे श्याम किसनराव घोंगे तर उपसभापती पदी हिंगणी चे माजी सरपंच हरिदास भगवानराव वाघ अविरोध.
ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षाचे वतीने दिले धनगर समाजाला विदर्भातील पहिले सभापती पदाचा बहुमान.
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वंचित बहुजन आघाडी चा झेंडा, सभापती पदी वं ब आघाडी चे श्याम किसनराव घोंगे तर उपसभापती पदी हिंगणी चे माजी सरपंच हरिदास भगवानराव वाघ अविरोध. ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षाचे वतीने दिले धनगर समाजाला विदर्भातील पहिले सभापती पदाचा बहुमान.

सहकार क्षेत्रासाठी महत्त्व पुर्ण समजल्या जाणाऱ्या तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक आज 31 जुलै रोजी पार पडली असुन यामध्ये पुन्हा एकदा या बाजार समिती वर सहकार शेतकरी वंचीत बहुजन आघाडी ने आपले वर्चस्व सिध्द केले असुन सभापती पदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम किसनराव घोंगे यांची तर उपसभापती पदी हिंगणी चे माजी सरपंच हरिदास भगवानराव वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात आज हि निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी डि, यु, शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक अविरोध पार पडली. यावेळी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
प्रा प्रदीप ढोले, सुनील इंगळे ,पुंडलीकराव अरबट, शांताराम काळे, दामोदर मार्के, गौरव यादगिरे, डॉ अशोकराव बिहाडे, सौ विजया शंकरराव ताथोड, सौ वंदना गणेशराव वाघोडे, संदीप खारोडे, रविंद्र बिहाडे, मोहन पाथ्रीकर, निरंजन राजनकर, हरिष तापडीया, राजेश टेकडीवाल, सुभाष खाडे हे संचालक व बाजार समिती प्रभारी सचिव सुरेश सोनोने सभेत उपस्थित होते. सर्व संचालक मंडळा मधून सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डि. यु. शेगोकार यांनी सभापती पदी श्याम किसनराव घोंगे व उपसभापती पदी हरिदास भगवानराव वाघ यांच्या नावाची घोषणा केली.
समर्थकांनी काढली जंगी विजयी मिरवणूक. –

दरम्यान सभापती, उपसभापती याची अविरोध निवड जाहीर होताच समर्थकांच्या वतीने मुख्य मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात आली, डाॅ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महामानवाना अभिवादन करण्यात आले.सभापती उपसभापती यांचे स्वागत करण्यात आले.
विजयी मिरवणूक दरम्यान अनेक राजकारणी मंडळींनी विविध गीतावर ठेका घेतल्याने कार्यकर्ते डबल जोषात दिसून आले. विजयी मिरवणूक सभेला वंचीत बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे,स्थानिक विविध गट, पक्ष संघटना पदाधिकारी गोपाल कोल्हे, किसनदादा घोंगे,श्रीकृष्ण जुंबळे,शंकरराव ताथोड, गणेशराव वाघोडे, प्रा सुधाकर येवले, रमेश ताथोड, कुलदिप तराळे, वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अशोकराव दारोकार, मंगेश घोंगे, प्रकाशसिह मलीये, प्रल्हाद पाचपोर, पुंडलीकराव पाथ्रीकर, विजय बलोदे, डॉ श्रीराम टोहरे, निलेश धनभर, राजु वानखडे, सोनू मलीये, पिंटु फोकमारे, सुनील पवार, ज्ञानेश्वर मार्के, प्रविण पोहरकार, स्वप्निल तराळे, अरविंद तिव्हाणे, सौरभ वाघोडे, महादेव नागे,मनोहर बाजोड, अरविंद अवताडे ,मनोहर यादगिरे, मधुसूदन बरिगे, श्रीकृष्ण वैतकार, जिवन बोदळे,रवी भिसे, पंजाब तायडे, खरेदी विक्री संचालक किसनराव बोडखे,अनंत अहेरकर,विठ्ठलराव खारोडे, सदानंद खारोडे, शिवहरी काळे,पंढरीनाथ कोरडे, देवानंद नवलकार, नितीन गावंडे, शांताराम कवळकार,गजानन वाकोडे, अरविंद तिव्हाणे, अशोक नराजे, मोहसिन भाई, गणेश गांवडे, शुभम नवलकार,खंडुजी घाटोळ, विठ्ठलराव लाखे, अनंता नवलकार, शिवा बाहे, बाबुजी खोब्रागडे, गजानन भोजने,चंदु बोरसे,संदीप गवई,विनायकराव वसतकार,इद्रिस भाई,रतन दांडगे, सलीमभाई, संजय पाचपोर, सुरेन्द्र भोंगळ, पंजाब तायडे, संदीप देशमुख,सुभाष भड,संदीप गवई, ज्ञानेश्वर बहाकर, दिपक अहेरकर
यांच्या सह शेतकरी सहकार गट, वंचीत बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील सर्व गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित होते.