आपला जिल्हाधार्मिक

तेल्हारा वासीयांचे आराध्य दैवत मॉ लटीयाल भवानी. अखंड हिंदुस्थानातील लटीयाल भवानी चे दुसरे शक्तीपीठ, 400 वर्षांची परंपरा.

तेल्हारा वासीयांचे आराध्य दैवत मॉ लटीयाल भवानी. अखंड हिंदुस्थानातील लटीयाल भवानी चे दुसरे शक्तीपीठ, 400 वर्षांची परंपरा.

तेल्हारा वासीयांचे आराध्य दैवत मॉ लटीयाल भवानी.
अखंड हिंदुस्थानातील लटीयाल भवानी चे दुसरे शक्तीपीठ, 400 वर्षांची परंपरा.

तेल्हारा- दि. 22 (सत्यशील सावरकर) अकोला जिल्हा तेल्हारा शहरातील भाविकांचे आराध्य दैवत भवीकांचे श्रध्दास्थान असलेल्या मॉ लटीयाल भवानी मंदिराचा एक गौरवशाली इतिहास आहे. भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या लटीयाल भवानी माता मंदिराचा परिसर सध्या नवरात्रोत्सवामुळे फुलला असुन नवरात्रोत्सव काळात हजारोंच्या संस्थेने भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी भरत असते.

अखंड हिंदुस्थानात लटीयाल भवानी माताची दोन शक्तीपीठे असल्याचे बोलले जाते. राजस्थान येथील फलोदी येथे मातेची एक शक्तिपिठ आहे दुसरे शक्तीपीठ महाराष्ट्रातील तेल्हारा शहरातील लटीयाल भवानी माता मंदीर. मंदिराला सुमारे 400 वर्षाचा इतिहास असल्याचे असे सांगितले जाते. या पुरातन अशा मा लटीयाल भवानी च्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध गावातून भावीक दर्शनासाठी येतात.
इच्छेला पावणारी आई लटीयाल भवानी भक्तांच्या मनोकामना पुर्ण करत असल्याची श्रद्धा आहे.
मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या मंदिराचे देखरेखीचा वारसा वैष्णव परिवाराकडे आहे. अश्विनी शुक्ल पक्ष शारदीय नवरात्रोत्सवात सर्वत्र जल्लोषात व भक्तीभावाने या ठिकाणी होते. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. मुर्ती चा अभिषेक महाआरती नैवैद्य अर्पण करून मातेची भक्ती भावात भावीक पुजा अर्चा करतात.

तेल्हारा शहरातील मॉ लटीयाल भवानी मदीराची देखभाल वैष्णव बैरागी यांची सातवी पिढी सेवा करीत आहेत. नित्य पूजा अर्चा, अखंड नंदादीप प्रज्वलन, अश्विनी शुक्ल प्रतिपदेची घटस्थापना, 9 दिवस मा भवानी ची आराधना, अन्नकूट आदी धार्मिक उपक्रम या मंदिरात राबविण्यात येतात. मंदिराचे मंहत कै किशोरदास महाराज वैष्णव यांचे पुत्र प्रविणदास वैष्णव, वैष्णव कुटुंब यांच्या मार्गदर्शनाखाली सहपरिवार लटीयाल भवानी मंदिराची देखभाल करतात.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!