आपला जिल्हा

नव्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीचे अर्ज १५ जूनपासून स्वीकारणार.

समाजकल्याण सहायक आयुक्त यांची माहिती.

नव्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीचे
अर्ज १५ जूनपासून स्वीकारणार.
समाजकल्याण सहायक आयुक्त यांची माहिती.
अकोला दि. 22 : नव्या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांसाठी अर्ज करण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे दि. १५ जूनपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येतील.

शासनाकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) आदी योजना “महाडीबीटी पोर्टल”व्दारे राबविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज हा प्रवेशप्रक्रियेचाच भाग
शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे ही बाब विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचाच भाग आहे. तसा दि. ७ जुलै २०२३ रोजीचा शासन निर्णय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची कार्यवाही संबंधित महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया चालू असतानाच पूर्ण करणे आवश्यक आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांनी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
असे आहे वेळापत्रक
कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम इ. 11वी, 12 वीसाठीचे (सर्व शाखा, एमसीव्हीसी, आयटीआय आदी) नवीन अर्ज व नुतनीकरणाचे प्राप्त अर्ज दि. 15 जून ते 15 ऑगस्ट या मुदतीत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत.
वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय सर्व शाखा कला, वाणिज्य, विज्ञान आदींसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज दि. 15जून ते 10 सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत.
वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रथम, द्वितीय, तृतीय अंतिम वर्ष (सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम) आदींचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज महाविद्यलयांनी दि. 15 जून ते 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अग्रेषित करावेत.

या वेळापत्रकानुसार महाविद्यालय स्तरावरील तातडीने नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन मंजूर केल्यास शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना अदा करण्याची पुढील प्रक्रीया तत्काळ करता येईल. यासाठी महाविद्यालयांनी इन्स्टिट्यूट प्रोफाईल अद्ययावत करणे, समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, सूचना महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे जेणेकरून अर्ज भरण्यापूर्वी त्यांना आवश्यक कागदपत्रे संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून काढणे सोयीचे होईल. अशी विशेष कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, डॉ. राठोड यांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!