चेन्नई येथील बुद्धिबळ स्पर्धेसाठी तेल्हारा येथील चमुची निवड. स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा चे 8 विद्यार्थ्यांची.
चेन्नई येथील बुद्धिबळ स्पर्धेसाठी तेल्हारा येथील चमुची निवड. स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा चे 8 विद्यार्थ्यांची.
चेन्नई येथील बुद्धिबळ स्पर्धेसाठी
तेल्हारा येथील चमुची निवड.
स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा चे 8 विद्यार्थ्यांची.

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था सलग्नित प्रांत स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा नागपूर येथील जिजाबाई लाभे स्मृती नवयुग विद्यालय व कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय येथे 14 व 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात पार पडली.
या स्पर्धेमध्ये विदर्भ प्रांतातील बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये बाजी मारली. वयोगट 14 मध्ये चिन्मय उंबरकार याने प्रथम क्रमांक मिळविला,कौशिक पवार याने तृतीय क्रमांक तर राज भारसाकळे याने चौथा क्रमांक आणि उत्कर्ष बाजोड यानी सहावा क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे वयोगट 14 मुलींमध्ये कु.स्वरा वाघमारे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. वयोगट 17 मध्ये अषिल मोहाळे याने प्रथम क्रमांक तर ओजस धनसुईकर याने द्वितीय क्रमांक ,समर्थ मानकर तृतीय क्रमांक, गिरीश बाजोड याने चौथा क्रमांक मिळविला. वरील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त बुद्धिबळ प्रशिक्षक बाळासाहेब बोदडे, क्रीडा शिक्षिका सौ उजवणे व शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापिका व वर्गशिक्षक यांना देतात.