विद्यार्थ्यांना खेळातील वाढीव गुणांसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक.
१५ मार्चपर्यंत ऑनलाईन प्रस्ताव देता येतील.
विद्यार्थ्यांना खेळातील वाढीव गुणांसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक.
१५ मार्चपर्यंत ऑनलाईन प्रस्ताव देता येतील.

अकोला, दि. ११ :
खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. त्याची प्रक्रिया आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली असून, १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणांसाठी अर्ज शिक्षण मंडळाकडे केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहेत.
कोणीही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण मंडळास ऑफलाईन अर्ज करू नये. ते स्वीकृत केले जाणार नाहीत. वाढीव गुणांसाठी अर्ज सादर करताना मंडळाच्या नियमानुसार २५ रू. चलन भरावे लागेल. त्याची प्रत प्रस्तावासोबत जोडावी. सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार ॲपचा वापर करून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घ्यावे. दि. १५ मार्चपर्यंत ऑनलाईन प्रस्ताव देता येतील, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट यांनी केले आहे.