बेलखेडच्या पेढ्यांची चव सातासमुद्रापार.
स्वातंत्र्य सैनिकीय निमकर्डे कुटुंब जपतेय परंपरागत व्यवसाय.
बेलखेडच्या पेढ्यांची चव सातासमुद्रापार.
स्वातंत्र्य सैनिकीय निमकर्डे कुटुंब जपतेय परंपरागत व्यवसाय.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड ह्या गावाला आपल्या व्यवसायाची ओळख मिळाली बेलखेड चा प्रसिद्ध पेढा व त्याची चव आज सातासमुद्रापार गेली आहे. खास चुलीच्या भट्टीवर कढईत विशिष्ट पद्धतीने हात मेहनत करून तिन चार तास घोटून तयार केलेल्या पेढ्याला मोठी मागणी आहे.
बेलखेड येथील स्वातंत्र्य सैनिक जयरामजी निमकर्डे विनोबा भावे यांचे अनुयायी, स्वदेशी, खादी,चरखा हातमाग चे पुरस्कर्ते. त्यांचे बंधू महादेव निमकर्डे यांचे कुटुंबीयांनी सुद्धा परंपरा, स्वदेशी चा पायंडा पुढे नेत 1960 च्या दरम्यान परंपरागत पेढ्याची केलेली ही सुरुवात १९६१ मध्ये मोहन आणि पुंजाराम निमकर्डे यांनी सुरू ठेवली. दुधासाठी हिवरखेड येथील दुध संकलन केंद्रातून दररोज १२ किलोमीटरवरून सायकलीवर दूध आणले जायचे. पुंजाराम भाऊ पेढा घोटत तर लहान भाऊ मोहन सायकल ची पायपीट करून दुध आणत व पेढे बनवीत होते.हे दररोज ची पायपीट दोघे बंधू करित होते. सुरूवातीला बेलखेड येथील मुख्य चौक मोठया साथीत भाड्याचे जागेत मोहन हाॅटेल म्हणून व्यवसाय चालू होता.रात्री बनविलेले पेढे सकाळी शेतात न्याहरी म्हणून एक पेढा अशी शेत मजुर, शेतकरी, गावकरी यांची विक्री होत होती. पुढे चविष्ट पेढ्याची श्रीमंती वाढत गेली ती पार सातासमुद्रापार गेली.
परंपरागत चुलीवर बनवलेल्या या पेढ्याला एक व्यावसायिक श्रीमंती मिळाली ती आजही कायम ठेवण्याचे काम पुंजाराम व मोहन निमकर्डे यांचे मुले अतुल, प्रवीण आणि मिलिंद निमकर्डे हे करित आहेत. तेल्हारा बेलखेड हिवरखेड या मार्गावर बेलखेड बस थांब्यावर आगे दुकान पिछे मकान या प्रमाणे व्यवसाय तिसऱ्या पिढीत आला आहे. वाढती मागणी पाहता आता दिवसातून दोन वेळा पेढा तयार केला जातो. दिवसभरात साधारणपणे ४० किलो पेढा जागेवरूनच विकला जातो.व्यवसायवृद्धी करून पेढ्या बरोबरच इतर नास्ता, फरसाण खाद्यपदार्थ, थंड पेय सुद्धा येथे मिळतात.
अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ५६ भोगांमध्ये बेलखेड चा पेढा पोहचला होता. देशातील अनेक दिग्गज नेत्यांनीही याची चव चाखली. त्यात माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे अनेक जणांचा उल्लेख केला जातो.त्याच प्रमाणे बेलखेडच्या पेढ्याची चव शेतमजूर, शेतकरी, गावकरी,तालुक्यासह इतरही ग्राहक यांच्या नातेवाईक आप्तेष्ट मार्फत अमेरिका, किर्गिझस्तान,लॉस एंजलीस, रशिया, कॅनडा, श्रीलंका या ठिकाणीही पोहचली आहे हे येथे उल्लेखनीय आहे.