गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण प्रचार रथाचे तेल्हाऱ्यात आगमन.
भारतीय जैन संघटनेचा पुढाकार.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण प्रचार रथाचे तेल्हाऱ्यात आगमन.
भारतीय जैन संघटनेचा पुढाकार.
तेल्हारा दि.२४
शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या योजनेअंतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण जनजागृती प्रचार रथ अकोला जिल्ह्यात तालुका तालुक्यात फिरत असून सदर रथाचे तेल्हारा शहरात दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी आगमन होऊन समारोप पार पडला.
भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने सदर योजनेच्या प्रचारार्थ अकोला येथून दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रचार रथाला प्रारंभ झाला. सदरहू प्रचार रथ अकोला , बाळापूर ,पातूर ,बार्शीटाकळी, मूर्तीजापुर, आकोट व तेल्हारा या तालुक्यातील गावागावात फिरून दिनांक २४ एप्रिल रोजी तेल्हारा शहरातील विविध वस्त्यांमध्ये फिरून सांगता करण्यात आली.
प्रचार रथ भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक हलवदिया यांच्या नेतृत्वात जनजागृती साठी निघाला होता. महाराष्ट्र सरकारमध्ये एक सामांजस्य करार करण्यात आला आहे तज्ञनुसार शासनाची ही योजना प्रत्येक गावापर्यंत नेऊन धरण व बंधारा मधील गाळ काढणे नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी मागणी निर्माण करण्याचे कार्य भारतीय जैन संघटना करीत असल्याचे दीपक हलवदिया यांनी प्रतिनिधीला सांगितले. त्यानुसार मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. तलावातला गाळ काढून त्याची पाणी साठवण क्षमता वाढवणे, नाला खोलीकरण रुंदीकरणाद्वारे वहन क्षमता सुधारून पूरस्थिती नियंत्रित करणे, भूजल पुनर्भरणाद्वारे पाणी पातळी वाढ करणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी सुपीक गाळ उपलब्ध करून देणे, पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी अनुदान देणे ही या योजनेची वैशिष्ट्ये असून गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री व इंधनाचा सर्व खर्च प्रशासन करेल, शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी सुपीक गाळ उपलब्ध होईल, योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी शासन अनुदान देईन, गाळामुळे खतांचा खर्च कमी होऊन कृषी उत्पन्नात वाढ होण्यास मदत् होईल, तलावाची पाणी साठवण क्षमता तसेच भूजल पातळी वाढ होईल असे या योजनेचे लाभ असल्याचे पत्रकात नमूद आहे.