समृद्ध पुर्णाकाठ…विकासाची आस…तुमची साथ, आमचा प्रयत्न… पुर्णाकाठ करू समृद्ध…
सत्यशील प्रभाकरराव सावरकर

समृद्ध पुर्णाकाठ…विकासाची आस…तुमची साथ, आमचा प्रयत्न… पुर्णाकाठ करू समृद्ध…सत्यशील प्रभाकरराव सावरकर

तेल्हारा – दि.
पुर्णाकाठ न्यूज नेटवर्क मध्ये लिखाण सुरू करताना पुर्णाकाठ नावाबद्दल सांगणे अगत्याचे वाटते. 1965 -1970 च्या काळात पुर्णाकाठ व श्रमशक्ती या नावाने जिल्ह्यातील झुंजार पत्रकार साहित्यिक भाई प्रभाकरराव सावरकर हे या वृत्तपत्रा चे संस्थापक संपादक होते. यांनी सुरू केलेल्या पुर्णाकाठ ह्या साप्ताहिका मध्ये येणाऱ्या बातमी ची दखल शासन दप्तरी घेतली जाऊन वाचकांना न्याय मिळत होता. पुर्णाकाठ अंकात काय विशेष येईल याची वाचक आवर्जून वाट पाहत होते. पुर्णाकाठ जिल्ह्यातील राजकीय पटलावर सडेतोड विश्लेषणासाठी प्रसिद्ध होता. या मधील लिखाणावरून कित्येक वेळा राजकीय खलबत होवून सत्तेचे सारीपाट बदलांचे चित्र पाहायला मिळाले. या वृत्तपत्रामुळे कित्येकांच्या समस्या प्रश्न निकाली लागले, तत्कालीन कठीण परिस्थितीत हे वृत्तपत्र आपली छाप ठेवून होते. अकोट तेल्हारा अकोला जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या वृत्तपत्रात काही काळ खंड पडला होता.स्व. भाई प्रभाकरराव सावरकर यांचे निधनानंतर पुर्णाकाठ सुरू व्हावा. भाई पत्रकार म्हणून स्मरण टिकून नवशिक्षीताना प्रेरणादायी पुर्णाकाठ सुरू ठेवावे हा विचार पुढे आला व त्यातूनच कालपरत्वे मुख्य संपादक म्हणून सत्यशील प्रभाकरराव सावरकर पुर्णाकाठ न्यूज या नावाने डिजिटल स्वरूपात आपल्यासमोर नव्या पर्वाची सुरुवात करीत आहोत. भाई प्रभाकरराव सावरकर यांची आठवण कायम राहावी त्यांनी जी शोषित, पीडित,वंचित, शेतकरी ,कामगार, शेतमजूर यांच्यासाठी लेखणी झिजवली तीच प्रेरणा घेऊन पुढे पुर्णाकाठ मध्ये लिखाण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. वाचकांचे प्रेम तत्कालीन पुर्णाकाठ ला मिळाले तोच विश्वास आम्ही लिखाणात सिद्ध करू,समाजातील सत्य, निपक्ष, निर्भीड पणे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील, व्देष,मत्सराच्या लेखणी पासून दुर राहण्याचा प्रयत्न राहील.
पुर्णाकाठ डिजिटल स्वरूपात सुरू करताना पुर्णा नदीचा विस्तार, भौगोलिक बाबींवर लिखाण राहील. न्यूज मध्ये क्रमाशा भागात सुरुवात करण्यासाठी पुर्णाकाठ उगमस्थान ते संगम या विस्तीर्ण अशा मध्यप्रदेश, विदर्भ, खान्देश भागातील पुर्णाकाठ ची भौगोलिक ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक स्थळे इत्यादी वैभव व त्याचबरोबर नदी काठावरील गावागावातील रत्न, शेतीनिष्ठ शेतकरी, व्यापारी इत्यादी वैशिष्ट्ये, सांस्कृतिक, धार्मिक वैशिष्ट्ये यांचा उहापोह या माध्यमातून क्रमशः करणार आहोत. प्रत्यक्ष उगमस्थान ते संगम भेटी घेऊन पुर्णाकाठ लेखणीच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न राहील. पुर्णाकाठा वरील समस्या, नागरिकांचे मूलभूत प्रश्न, गरजा मांडण्याचा प्रयत्न राहील. हे साध्य करू डिजिटल पुर्णाकाठ च्या माध्यमातून….तुमची साथ…आमचा प्रयत्न…पुर्णाकाठ करू समृद्ध….
जय क्रांती..
सत्यशील प्रभाकरराव सावरकर
मुख्य संपादक पुर्णाकाठ न्यूज