आपला जिल्हा

स्व.बाबासाहेब खोटरे विद्यालय, सिरसोली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा संस्था नागरवाडी, तालुका चांदूरबाजार,जिल्हा अमरावती चा उपक्रम.

स्व.बाबासाहेब खोटरे विद्यालय, सिरसोली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा संस्था नागरवाडी, तालुका चांदूरबाजार,जिल्हा अमरावती चा उपक्रम.

स्व.बाबासाहेब खोटरे विद्यालय, सिरसोली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा संस्था नागरवाडी, तालुका चांदूरबाजार,जिल्हा अमरावती चा उपक्रम.

वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा संस्था नागरवाडी, तालुका चांदूरबाजार,जिल्हा अमरावती यांच्या तर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालय सिरसोली येथे वर्ग 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

स्व.बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविघालय सिरसोली तालुका तेल्हारा येथे दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, सिरसोलीचे अध्यक्ष सुरेश दादा खोटरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून बापूसाहेब देशमुख,सागर बापू देशमुख,प्रा.भैय्यासाहेब देशमुख ,सुधीर बापू देशमुख, प्रा.राजेंद्र देशमुख ,माजी आ.वसंतराव खोटरे,कुंजीलाल कोठारी अकोट, प्राचार्य गोपाल ढोले सर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व स्व. बाबासाहेब खोटरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व आलेल्या पाहुण्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकामधून प्राचार्य मिलिंद खोटरे सर यांनी स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा संस्था नागरवाडी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर गरजू विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना वह्या,पेन, पेन्सिल, पुस्तके,कंपास, बॉल पेन,स्केच पेन यांचे वाटप करण्यात आले .या प्रसंगी शालेय पोषण आहार मदतनीस यांना देखील साडी वाटप करण्यात आले.
पुढील वर्षी देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल असे सागर बापू देशमुख यांनी जाहीर केले.वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा संस्थान नागरवाडी चे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले.याप्रसंगी संस्था सचिव मा. आ. वसंतराव खोटरे सर, सुरेश दादा खोटरे यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.याप्रसंगी विज्ञान नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित डॉक्टर विठ्ठलराव गेबड, ऋषिकेश खोटरे, पत्रकार संतोषराव ताकोते , नानासाहेब देवतळे, श्रीराम लोखंडे, पत्रकार विनोद सगणे व पत्रकार लालसिंग अडाणी, नारायणराव देवतळे ,श्रीराम लोखंडे, जगदेव कात्रे सर , निळकंठ काळे सर , नंदाताई गावंडे मॅडम, उमेश तेलगोटे सर ,प्रमोद आखरे सर,योगेश मैड सर ,डाबेराव मॅडम ,अंजली भारसाकळे मॅडम, डोंगरे मॅडम,किसन सोलकर, गजानन भारसाकळे, सागर खोटरे,नागरवाडी येथील संस्थेचे स्वयंसेवक तसेच वर्ग पाच ते बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष नहाटे सर यांनी केले, स्वागत गीत अंजली खोटरे मॅडम यांनी म्हटले तर आभार प्रदर्शन राजेश तेलगोटे सर यांनी केले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या साहित्या बद्दल आनंद व्यक्त केला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!