आपला जिल्हा

ड्रोन वापरास 3 जुन पर्यंत बंदी.

जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचा आदेश जारी.

ड्रोन वापरास 3 जुन पर्यंत बंदी.
जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचा आदेश जारी.

अकोला, दि. 21 : जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी हा आदेश जारी केला असून, तो दि. ३ जूनपर्यंत लागू राहील.

पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त केले. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले. आता त्याला स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो लाईट, एअरक्राफ्ट, पॅरामोटर, हँगग्लायडर, हॉट एअर बलून अशी साधने बाळगताना किंवा वापरताना आढळल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश अकोला जिल्ह्याच्या हद्दीत दि. ३ जूनपर्यंत लागू राहील.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!