विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंच चा स्मार्ट मिटर ला विरोध.
मंचच्या वतीने विद्युत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा.
विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंच चा स्मार्ट मिटर ला विरोध.
मंचच्या वतीने विद्युत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा.

शासकीय कार्यालये,नवीन विद्युत कनेक्शन, सौर ऊर्जा युनिट चे ठिकाणी तसेच फॉल्टी मिटर असेल तेथेच स्मार्ट मिटर बसवावे अशी पॉलिसी ठरलेली असताना सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने लावलेल्या सर्व स्मार्ट मिटर ला विरोध असून पॉलिसी शिवाय चुकीच्या पद्धतीने लावलेले सर्व स्मार्ट मिटर काढून त्या ठिकाणी सुरु असलेले जूने च मिटर पुर्ववत लावण्यात यावे तसेच यापुढे कुठेही सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने स्मार्ट मिटर लावू नये अन्यथा विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंचच्या वतीने विद्युत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मंचच्या वतीने अशोक घाटे, डॉ मनमोहन व्यास, गोपाल कोल्हे,शहिदखॉ पठाण, माणिक घाटे,अजय धाके, गुलाम आरीफ, राहुल घोडेस्वार यांनी विद्युत विभाग 33 केव्ही उपकेंद्राचे प्रभारी अभियंता प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.