नव्याने ५३१ सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर.
९ जुलै रोजी तालुका स्तरावर तहसील कार्यालयात सोडत.
नव्याने ५३१ सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर.
९ जुलै रोजी तालुका स्तरावर तहसील कार्यालयात सोडत.

अकोला जिल्ह्यातील २०२५ ते २०३० दरम्यान मुदत संपणाऱ्या ५३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण ९ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात येणार आहे.
अकोला,अकोट,तेल्हारा, मुर्तिजापूर, पातूर बाळापूर,बार्शीटाकळी तालुक्यातील २०२५ ते २०३० दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत चे यापूर्वी ६ मे २०२५ रोजी आरक्षण जाहीर केले होते मात्र ग्रामविकास विभागाने नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आल्याची अधिसूचना १३ जून २०२५ रोजी प्रसिध्द केली असून त्याद्वारे ९ जुलै रोजी आरक्षण निश्चित होणार आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बुधवार, २ जुलै रोजी अध्यादेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, या वर्षाअखेर बहुतांश ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे. त्या पृष्ठभूमीवर सरपंच पदाचे आरक्षण ६ मे रोजी निश्चित करण्यात आले होते. याबाबत मार्च महिन्यात आरक्षणाची अधिसूचना काढली होती. मात्र, १३ जून रोजी सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया नव्याने ठरवून अधिसूचना शासनाने काढली आहे. त्यानुसार आरक्षण सोडत देखील नव्याने काढण्यात येणार आहे. यामध्ये २६७ ग्रामपंचायत मध्ये महिला आरक्षण निश्चित केले आहे.
आता सरपंच निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने या आरक्षण निवडीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा नजरा आता या आरक्षण प्रक्रियेकडे लागल्या आहेत.
प्रवर्गनिहाय असे आरक्षण निश्चित –
> अनुसूचित जाती १२७, अनुसूचित जाती महिला राखीव ६६, अनुसूचित जमाती ४६, अनुसूचित जमाती महिला राखीव २४, नागरिकांचा मागास प्रवर्ग १४३, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ७३, खुला प्रवर्ग २१५, खुला प्रवर्ग महिला राखीव १०४ असे आरक्षण जिल्ह्यात असेल, असे अधिसूचनेत नमूद आहे.
येथे होणार आरक्षण सोडत –
अकोला-
डीबीए हॉल तहसील कार्यालय,अकोला
तेल्हारा –
तहसील कार्यालय तेल्हारा
आकोट –
तहसील सभागृह पोपटखेड रोड
बाळापूर –
न.प. सभागृह नगर परिषद बाळापूर
पातूर-
तहसील कार्यालय पातूर नवीन हॉल
मूर्तिजापूर-
धान्य गोडाऊन क्र. ५ एसडीओ कार्यालय,
बार्शीटाकळी-
पंस कार्यालय बार्शिटाकळी येथे राहील.