तेल्हारा तालुक्यात ईद उत्साहात साजरी.
हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन.

तेल्हारा दि.-
तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बहुतांश ठिकाणी हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना गळाभेट घेऊन शुभेच्छा देवून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.
तेल्हारा तालुक्यात दि. 30 च्या रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर आज दि. 31 ला रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तेल्हारा शहर, हिवरखेड, बेलखेड,दानापूर,अडगाव, पचंगव्हाण, तळेगाव बाजार, सिरसोली, माळेगाव, गोर्धा, इसापूर येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यात आली त्यानंतर ईदगाह वर सामुहिक प्रार्थना,स्नेहभेट नंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना भेट घेऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या यावेळी तेल्हारा व हिवरखेड दोन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत गावात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त चोख होता.

*बेलखेड येथे रमजान ईद साजरी.*
बेलखेड येथे मोठी मज्जीत वार्ड 3 मधील जामा नुरानी मज्जीत,वार्ड 5 मधील टिपू सुलतान चौक इंदिरा आवास मधील मज्जीत,वार्ड 1 मधील कुरेशी मोहल्ला मोठी साथ जवळील मज्जीत येथे गावातील मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून दहा वाजता ईदगाह येथे सामुहिक पठन केले. सर्व समाज बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक शुभेच्छा दिल्या. गावातील हिंदू प्रतिष्ठीत नागरिक यांनी मुस्लिम बांधवांना ईदगाह येथे भेटून ईद च्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद हा केवळ आनंदाचा सण नसून त्यामागे समर्पण, संयम, दानशूरता आणि मानवतेचा महान संदेश आहे. या पवित्र दिनी आपण एकमेकांप्रती प्रेम, सहकार्य व सद्भावना व्यक्त करून हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन घडवू अशा प्रकारच्या शुभकामना गळाभेट घेऊन व्यक्त केल्या. मज्जीत मदरसा येथील लहान मुलांनी आपल्या अभ्यासातील विविध प्रकारच्या ओवीचे पठन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या मधील विविधांगी गुणांचे उपस्थितीतांनी कौतुक केले.

*तळेगाव बाजार येथे रमजान ईद साजरी.*
तळेगाव बाजार येथील माजी पोलीस पाटील भाऊसाहेब खारोडे,मधुकरराव ठोंबरे, रावसाहेब खारोडे, पत्रकार सदानंद खारोडे, उध्दव मानखैर, सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष किशोर खारोडे, हिंमत पाटील, सागर मानखैर, गोलु खारोडे, मयुर खारोडे,देवेंद्र भड यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जामा मस्जिद चे अध्यक्ष रशिद शा,वायदभाई, मो ईदरिस, रफिकभाई ,मुजफ्फर भाई, क्षमाभाई, मो सिद्दिक, साजिद खा, जम्मुभाई, नाशिरखा पठाण, बबलुभाई, भुराभाई सह गावातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
