नवरात्र दहा दिवसांच्या उपवासात वाईट गुणांना सोडून सदविचारी बना – ह. भ. प. नम्रता पाटील खुमकर बेलखेड येथील विशाल जनसमुदयाच्या पहिल्या किर्तन सेवेतून उदबोधन.
नवरात्र दहा दिवसांच्या उपवासात वाईट गुणांना सोडून सदविचारी बना - ह. भ. प. नम्रता पाटील खुमकर बेलखेड येथील विशाल जनसमुदयाच्या पहिल्या किर्तन सेवेतून उदबोधन.
नवरात्र दहा दिवसांच्या उपवासात वाईट गुणांना सोडून सदविचारी बना – ह. भ. प. नम्रता पाटील खुमकर
बेलखेड येथील विशाल जनसमुदायाच्या पहिल्या किर्तन सेवेतून उदबोधन.

तेल्हारा – दि.
श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळ बेलखेड यांचे वतीने श्री शिवाजी महाराज चौक दरबार मळी येथे दि. 25 सप्टेंबर ला संध्याकाळी 8 वाजता बेलखेड कन्या ह. भ. प. नम्रता ताई खुमकर यांचे पहिले हरिकीर्तन सेवा विशाल अशा जनसमुदाय समोर संपन्न झाली यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दहा दिवसांच्या उपवास करताना किमान दहा वाईट विचारांना सोडून संसाराची घडी बसवा असे उदबोधन केले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दरबार मळी बेलखेड येथे आयोजित विशाल जनसमुदायाला उदबोधन करताना त्या बोलत होत्या. किर्तन सेवा दरम्यान विदर्भ गाण कोकिळा ख्याती प्राप्त गुरुवर्य गजानन महाराज खोंड व अकोली, बेलखेड येथील टाळकरी, मृदुंगवाचार्य, विणेकरी यांनी संगीत साथ दिली.
श्री कल्याण स्वामी संस्थान, अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, चंकलंबा जिल्हा बिड येथील गुरुवर्य साध्वी सोनाली दीदी करपे यांची शिष्या बेलखेड ची कन्या ह. भ. प. कु. नम्रताताई नरेंद्र पाटील खुमकर यांनी आपल्या पहिल्या किर्तन सेवेतून गावगाड्यातील चुलीवर भाकर करणाऱ्या माय माऊलीच मन,शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घामाच मन,ओट्यावरील युवकांच समाज मन पहिल्याच किर्तन सेवेतून जिंकले. किर्तन सेवेतून दिलेले दृष्टांत समाज मनाचा ठाव घेणारे होती. विटेवरी उभा पांडुरंग भक्तांच्या दरबारी प्रत्यक्षात विठ्ठल उभा करून संत तुकारामांच्या अभंगांचे दाखले, नामदेव जनाबाईंची निष्ठा,श्रावण बाळाचे मातापित्यांच्या ठायी सेवा, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी, जंगदबेचा जागर नवरात्रीचा उदोउदो त्यांनी किर्तन सेवेतून केला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार जागवून श्रोत्यांचे मन जिंकली.
किर्तन सेवा दरम्यान मंडळाचे पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी बेलखेड ची कन्या -विदर्भ कन्या होईल अशा भरभरून शुभेच्छा युवती किर्तनकार ह. भ.प. नम्रता यांना देवून शाल श्रीफळ देवून सत्कार केला. किर्तन सेवेचे आयोजन दरबार मळी, छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळ बेलखेड यांनी केले होते.