बालसंस्काराकरिता वेळ देणारे शिक्षक धन्यतेस पात्र – ज्ञानेशप्रसाद सावरकर
श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिर वारी भैरवगड.
बालसंस्काराकरिता वेळ देणारे शिक्षक धन्यतेस पात्र – ज्ञानेशप्रसाद सावरकर
श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिर वारी भैरवगड.

आज रोजी सामान्यतील सामान्य व्यक्ती सुद्धा स्वार्थ सिद्ध झाल्याशिवाय कर्म करण्याकरिता प्रवृत्त होत नाही. असे असतांना सुद्धा श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना विना मानधन तत्वावर सर्वांगीण विकासाचे धडे देणारे संतश्री वासुदेवजी महाराजांचे कृपांकित असलेले असामान्य शिक्षकवृंद हे खरोखर धन्यतेस पात्र असल्याचे गौरवोद्गार श्री ज्ञानेशप्रसाद महाराज सावरकर यांनी काढले.
ते आज ज्ञानेश आश्रमस्थीत बालसंस्कार शिबिराच्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते . ते पुढे म्हणाले की , भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या तालमीत तयार झालेले संपूर्ण शिक्षकवृंद हे कृतज्ञतापूर्वक सेवेचे असिधाराव्रतधारी असून , समाजातील इतरही प्रबोधनकारांनी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनातील काही काळ असाच निष्काम सेवे करिता राखून ठेवला पाहिजे . जेणेकरून आपण जे विनामूल्य शिकलो त्यातून अंशतः का होईना उत्तीर्ण होता येईल. यावेळी प्रा. डॉ. गोपाल झामरे यांनी समायोजित भाषण करीत असताना भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ हे संत श्री वासुदेवजी महाराज यांचा वसा व वारसा समर्थपणे चालवित असल्याचे म्हटले. तसेच अशा कार्याला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.