पदोन्नती व निवड श्रेणी प्रश्न निकाली निघणारं.
शिक्षक संघटना एकवटल्या.

अकोला -दि.
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित पदोन्नती व निवड श्रेणी करिता जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संघटनांनी अनेकदा निवेदन दिले परंतु जिल्हा परिषद प्रशासनाकडून रखडलेला पदोन्नती आणि निवड श्रेणी प्रत्यक्ष वेतनात आद्या करण्यात आलेले नाहीत याबाबत संघटनांनी 20 फेब्रुवारीला मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सदर दोन मागण्या पूर्ण न झाल्यास 10 मार्चपासून साखळी उपोषण करण्याचे निवेदन सादर केले होते परंतु आठ दिवस उलटूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्याने संघटनांनी अकोला पूर्वचे आ. रणधीरभाऊ सावरकर यांच्याकडे निवेदन सादर केले व त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पदोन्नती व निवड श्रेणी मंजूर करून लाभ देण्याचे सुचित केले आणि प्रशासन कामाला लागले असून येत्या 7 मार्च पर्यंत शिक्षकांना पदोन्नती देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना आज झालेल्या बैठकीत दिले आणि वेतनश्रेणी बाबतीत मंत्रालयातून येत्या दोन दिवसात मार्गदर्शन करिता पत्रव्यवहारही केला जाईल असे सांगितले .

संघटना आपल्या साखळी उपोषणावर ठाम असून 10 मार्चपूर्वी जर उपरोक्त दोन मागण्या न पूर्ण झाल्यास साखळी उपोषण करण्यात येईल सदर साखळी उपोषणात जवळपास 500 ते 600 लाभार्थी शिक्षक कुटुंबासमवेत सहभागी होणार आहेत त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील
असे शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले .जिल्हा परिषद लाभार्थी शिक्षक व जिल्ह्यातील अकरा संघटना सक्रिय सहभागी असून काहींनी पाठींबा दिला आहे.अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची अभूतपुर्व साखळी उपोषनाची तयारी सुरू असून हे सगळे लोक व संघटना जिल्हा परिषद शिक्षक संघर्ष संघटना,अकोला या नावाने दि १० मार्च पासून मागण्या मान्य न झाल्यास उपोषन करतील असे अंतिम निवेदनजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ,शिक्षणाधिकारी प्राथमिक ,वित्त अधिकारी पोलिस अधिक्षक म.न.पा.आयुक्त यांना दिले आहे.