तेल्हारा येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त तीन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन.
शुक्रवारी आरोग्य तपासणी शिबिराने प्रारंभ.
तेल्हारा येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त तीन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन.
शुक्रवारी आरोग्य तपासणी शिबिराने प्रारंभ.

तेल्हारा दि. १
तेल्हारा शहरात शुक्रवार दि ४ एप्रिल २०२५ ते रविवार दि ६ एप्रिल २०२५ असे ३ दिवस श्रीरामजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती तेल्हाराच्या वतीने शुक्रवार दिनांक ४एप्रिल २०२५रोजी सकाळी१० वाजेपासून नगरपरिषद कॉम्प्लेक्स टॉवर चौक तेल्हारा येथे रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर व रक्तदात्यांना निशुल्क हेल्मेट भेट, शनिवार दि.५ एप्रिल२०२५ रोजी सकाळी १० वाजता तर सायंकाळी पाच वाजता जिजाऊ उद्यान शेगाव नाका येथून मोटार सायकल रॅली, ७ वाजता श्री शिवाजी स्मारक टॉवर चौक येथे श्रीराम दरबार स्थापना, रविवार ६एप्रिल२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सेठ बन्सीधर विद्यालयाच्या प्रांगणातून पालखी, वारकरी, डमरू पथक, रथ, राम दरबार, राज दरबार, डीजे, लाईट शो, धार्मिक झाकी सह भव्य शोभायात्रा निघणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून आयोजकांनी दिली आहे.