श्रीराम नवमी उत्सवांतर्गत ठिक ठिकाणी सामाजिक व धार्मिक उपक्रम.
श्रीराम नवमी उत्सव समिती तेल्हारा चे आयोजन. भव्य रक्तदान शिबिर व मोटर सायकल रॅली.
श्रीराम नवमी उत्सवांतर्गत ठिक ठिकाणी सामाजिक व धार्मिक उपक्रम.
श्रीराम नवमी उत्सव समिती तेल्हारा चे आयोजन.
भव्य रक्तदान शिबिर व मोटर सायकल रॅली.
तेल्हारा दि.
श्रीराम नवमी उत्सव समिती तेल्हारा द्वारा आयोजित श्रीराम नवमी उत्सवांतर्गत शहरात ठिक ठिकाणी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम करून श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला.

शहरात आयोजन समितीचे वतीने शनिवार दि.५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी सुमारे ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर सायंकाळी सात वाजता शेगाव नाका येथून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. भगव्या पताका व झेंडे मोटार सायकल ला लावून प्रभू श्रीरामचंद्रांच्या जय जय कारासह निघालेल्या मोटार सायकल रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.
श्री शिवाजी महाराज स्मारक तेल्हारा येथे दि.५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पार पडलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना नि:शुल्क हेल्मेट चे वितरण करण्यात आले. मा जिजाऊ उद्यान तेल्हारा येथून याच दिवशी सायंकाळी ७ वाजता मोटर सायकल रॅली काढण्यात आली. तेल्हारा शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या मोटार सायकल रॅलीतील मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी महाराज की जय, जय श्रीराम इत्यादी घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. रक्तदान शिबिरास व मोटार सायकल रॅलीस मिळालेला प्रतिसाद व प्रगटलेला उत्साह प्रचंड होता.

दि.६ एप्रिल २०२५ रोजी शहरातील श्रीराम मंदिरात, माँ लटियाल भवानी मंदिरात श्रीराम भक्त व हिंदू बंधू भगिनींनी श्रीराम जन्मोत्सव साजरा केला. श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गावात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई तसेच भगव्या पताका उभारून, रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात आले होते. विविध मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव निमित्त भाविकांनी पूजा अर्चना, महाआरती व प्रसादाचा लाभ घेतला. वारी हनुमान मंदिर, तेल्हारा येथील मा लटियाल भवानी मंदिर येथे महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री शिवाजी महाराज स्मारक येथे श्रीराम दरबार चे देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने सायंकाळी गावातील मुख्य मार्गाने ट्रॅक्टरवर सजावट करून विविध देखाव्यांचे सादरीकरणासह अश्व स्वार छत्रपती शिवाजी महाराज व प्रभु रामचंद्र यांच्या झांकी सर्वांचे लक्ष वेधत होत्या. शहरातील मुख्य रस्ता वरून शहरात टाळमृदंगाच्या गजरात वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. श्रीराम नवमीच्या पृष्ठभूमीवर तेल्हारा शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.