गुणवंत पत्रकार पाल्यांचा कौतुक भेट सत्कार.
तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे आयोजन.

तेल्हारा –
मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने पत्रकार मित्रांच्या पाल्यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षांमध्ये केलेल्या यशस्वी वाटचाली निमीत्ताने तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने गुणवंत मुलांचे कौतुक भेट व छोटेखानी सत्कार बाळशास्त्री जांभेकर सभागृह पत्रकार भवन तेल्हारा येथे करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन तेल्हारा तालुका पत्रकार संघ जेष्ठ पदाधिकारी अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पन करण्यात आले. त्यानंतर पत्रकार पाल्य भाविक धर्मेश चौधरी व हिमांशु प्रशांत विखे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देवून जेष्ठ पत्रकार सुरेश शिंगणारे,प्रा.कृष्णा फंदाट यांच्या हस्ते व पत्रकार सत्यशील सावरकर,अनंतराव अहेरकर, रामभाऊ फाटकर, प्रा. विद्याधर खुमकर,धर्मेश चौधरी,प्रशांत विखे,सदानंद खारोडे,सुरेश सिसोदिया,रवि शर्मा यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन प्रा विद्याधर खुमकर तर आभार सत्यशील सावरकर यांनी व्यक्त केले.