आय टी आय प्रवेश प्रकियेला सुरुवात.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.

विष्णुदास महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे सत्र 2025-26प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करणे सुरु आहे अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस एस उईके यांनी दिली आहे .
दिवसेदिवस औद्योगिक प्रशिक्षण संस्था कडे प्रवेश घेण्याचा विद्यार्थीचा कल वाढत असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आय टी आय च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. तसेच उच्च शिक्षणासाठी साठी सुद्धा मोठयाप्रमाणावर संधी उपलब्ध असून पॉलीटेकनिक च्या थेट व्दितीय वर्षाला आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो . आय टी आय च्या माध्यमातून विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते.
आय टी आय च्या माध्यमातून युवकांना नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करायला मिळतात.
त्याच बरोबर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार ,नोकरी, व स्वयंरोजगार संधी उपलब्ध आहेत.तेल्हारा येथील आज पर्यंत प्रशिक्षणार्थी पुर्ण झालेल्या अनेक प्रशिक्षणार्थीनी स्वतःचे व्यवसाय, उद्योग, स्वयंरोजगार खासगी व शासकिय नोकरी मध्ये मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे.
यावर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे विजतंत्री, फिटर, तारतंत्रि, , यांत्रिक मोटार गाडी, ड्रेस मेकिंग, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, वेल्डर ,या ट्रेड साठी प्रवेश इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य उईके यांनी केले आहे.
तसेच प्रवेश संदर्भात काही अडचण असल्यास माहिती व समुपदेशन करीता दररोज सकाळी १०ते ५ वेळेत संस्थेतील समुपदेशन केंद्रात भेट द्यावी.
तेल्हारा आय टी आय येथे उपलब्ध अभ्यासक्रम –
येथे दोनवर्षीय अभ्यासक्रम साठी विजतंत्री, तारतंत्री , यांत्रिक मोटार गाडी ,फिटर व एक वर्ष अभ्यासक्रम साठी ड्रेस मेकिंग ,फ्रुट अँड व्हिजिटेबल प्रोसेसिंग , वेल्डर या ट्रेड चा समावेश आहे.
कौशल्य सह स्वरोजगार शिक्षण सद्या काळाची गरज आहे हेच बघून दिवसेंदिवस आय टी आय कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आय टी आय मधील विविध ट्रेड ला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया मध्ये सहभाग घ्यावा. आय टी आय च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत.
-प्राचार्य एस एस उईके शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा.