लढवय्या भाविक चौधरी चे दहावीत घवघवीत यश.
जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या बलावर केले यश संपादन.
लढवय्या भाविक चौधरी चे दहावीत घवघवीत यश.
जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या बलावर केले यश संपादन.

तेल्हारा शहरातील वृत्तपत्र प्रतिनिधी धर्मेश चौधरी यांचा मुलगा भाविक एकांड्रॉप्लासिया या आजाराने त्रस्त. भाविक मणक्यामध्ये नस हाडाच्या अपुऱ्या वाढीमुळे दबल्या होत्या हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होत होती त्याला चालणे सुध्दा जड होत होते अश्या स्थितीत डॉक्टरांनी त्याच्यावर लवकर शस्त्रक्रिया करणे गरजेचे सांगितले. दहावीचे वर्ष, अभ्यासाची चिंता अशातच मुंबई येथील सर एच एन रिलायन्स हॉस्पिटल येथे त्याला उपचारासाठी नेले असता त्याच्या पाठीमध्ये आणि मानेच्या मणक्यामध्ये नस दबत असल्याचे एमआरआय मध्ये दिसून आले तसेच मेंदूतून निघणारा सीएसएफ कॉड चे होल हे अगदी लहान असल्याचे दिसले त्यामुळे त्याचेवर प्रथम शस्त्रक्रिया करण्यात आली. मॅगनम फोरामन व मानेमागील मणक्याची ची ही शस्त्रक्रिया अतिशय अवघड होती ही शस्त्रक्रिया दहा तास चालली त्यानंतर लगेच दीड महिन्याने त्याचेवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये त्याच्या पाठीच्या कण्यात रॉड टाकण्यात आला हि शस्त्रक्रिया देखील दहा तास चालली त्यानंतर यातून सावरत भाविक जिद्दीने चालू लागला. दहाव्या वर्गात शाळेत जाऊ लागला उंची कमी असल्याने अनेकांच्या व्यंगात्मक नजारा त्याचेकडे असायचा पण त्याची किंचितही तमा त्याने बाळगली नाही. कुठलीही शिकवणी नाही, वर्गात शिकला तेवढेच आणि घरी अभ्यास सोबतच सम्पूर्ण कॉपीमुक्त परीक्षा, लिहायचा त्याचा वेग शारीरिक दुर्बलते मूळे कमी या सर्व परिस्थितीसोबत लढण्याची त्याची जिद्द म्हणजे खरेच इतरांना प्रेरणादायी आणि कौतुकास्पद, अश्याही परिस्थितीत त्याने जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या बलावर घेतलेले 70•20 टक्के गुण म्हणजे समाधानकारक आणि प्रेरणादायी.
खरंच लढवय्या भाविक अभिनंदनास पात्र ठरतो त्याला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा, भाविकाच्या पाठीमागे आई-वडील खंबीरपणे उभे राहिले शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन मिळाले आहे.