छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान.
तेल्हारा तालुक्यातील सहा मंडळात आयोजित शिबिराचा लाभ घेण्याचे तहसीलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान.
तेल्हारा तालुक्यातील सहा मंडळात आयोजित शिबिराचा लाभ घेण्याचे तहसीलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन.
तेल्हारा –
तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता,शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण करण्यास व तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळ स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करणे बाबत शासनाचे निर्देश आहेत.
ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला यांना रहिवासी दाखले, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड,सामाजिक लाभाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना इत्यादी महसूल विभागाशी संबंधित प्रमाणपत्राचे वाटप, प्रमाणपत्र बाबत जनतेच्या तक्रारी निकालात काढण्यात येऊन मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येऊन त्यामध्ये विविध महसुली दाखले, जनतेच्या तक्रारीचे निवारण तथा मार्गदर्शन करून महसुली प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान तेल्हारा तालुक्यात सहा मंडळ स्तरावर राबविण्यात येणार आहे.
तेल्हारा मंडळ, पाथर्डी, पंचगव्हाण, हिवरखेड, आडगाव, माळेगाव या सहा मंडळात अभियान राबविण्यात येणार आहे. तेल्हारा मंडळासाठी 19 जून रोजी सकाळी दहा वाजता हेडगेवार सभागृह येथे, पाथर्डी मंडळात ग्रामपंचायत कार्यालय पाथर्डी येथे, पंचगव्हाण मंडळात ग्रामपंचायत कार्यालय आडसूळ येथे दि. 19 ला व
हिवरखेड मंडळात दिनांक 20 जून रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड हिवरखेड येथे, आडगाव मंडळात ग्रामपंचायत कार्यालय आडगाव येथे, माळेगाव मंडळात जिल्हा परिषद शाळा माळेगाव येथे महा राज्यसभा अभियान शिबिर राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आप आपल्या मंडळात दिलेल्या तारखेला व वेळी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.