आपला जिल्हा

अद्ययावत ‘रोड सेफ्टी व्हिजन व्हेईकल’ जिल्ह्याच्या सेवेत दाखल.परिवहन कार्यालय उपक्रम.

मदतकार्याबरोबरच लोकशिक्षणा साठी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहन उपयुक्त - जिल्हाधिकारी अजित कुंभार.

अद्ययावत ‘रोड सेफ्टी व्हिजन व्हेईकल’ जिल्ह्याच्या सेवेत दाखल.परिवहन कार्यालय उपक्रम.
मदतकार्याबरोबरच लोकशिक्षणा साठी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहन उपयुक्त – जिल्हाधिकारी अजित कुंभार.

अकोला, दि. २५ : जिल्ह्यात अपघातप्रवण स्थळांची संख्या शून्यावर आणणे आवश्यक आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणतानाच प्रभावी लोकशिक्षण देणे गरजेचे आहे. बचावकार्याबरोबरच लोकशिक्षणासाठी ‘रोड सेफ्टी व्हिजन व्हेईकल’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केला.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ‘रोड सेफ्टी व्हिजन’ हे अत्याधुनिक सुविधा असलेले वाहन जिल्ह्याच्या सेवेत रूजू झाले. त्याला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रसाद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन दराडे, अनिरूद्ध देवधर, संदीप तायडे, संदीप तुरकणे, किरण लोणे, मनोज शेळके आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या प्रस्तावानुसार जिल्हा नियोजन समितीने या वाहनासाठी ३३ लक्ष रू. निधी उपलब्ध करून दिला. त्यातून हे वाहन निर्माण झाले आहे.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, वाहनात सर्व्हेलन्स कॅमेरा, सर्चलाईट, कटर, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम अशा अनेक सुविधा आहेत. अपघात घडूच नयेत यासाठी शिस्त निर्माण करणे आवश्यक आहे. बचावकार्याबरोबरच जनजागृतीसाठी हे वाहन उपयुक्त ठरेल. अपघातप्रवण स्थळांची संख्या शून्यावर आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री. भुयार म्हणाले की, वाहनात सर्व्हेलन्स कॅमेरा, सर्चलाईट सुविधा आहेत. या व्हेईकलने साडेसात टनपर्यंत वजन असलेले वाहन ओढून नेता येते. एखादी व्यक्ती वाहनात अडकली असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी लागणारे ‘कटर’सुद्धा या वाहनात आहे.
महामार्गावर असलेल्या गावांतून, ग्रामीण भागातूनही बैलगाडी, ट्रॅक्टर, दूधविक्रीसाठी येणारे विक्रेते अशी वाहतूक होते. अनेकदा चुकीच्या दिशेने येणा-या वाहनांचे अपघात होतात. ते टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी या उपक्रमाद्वारे लोकशिक्षण देण्यात येईल. या वाहनाद्वारे वाय-फाय सेवेचा वापर करून वाहतूक शिकाऊ परवानाही मिळवता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे,केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रसारही याद्वारे करण्यात येणार आहे, असे श्री. भुयार यांनी सांगितले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!