तेल्हारा येथे वंचित बहुजन आघाडी भव्य संवाद दौरा.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती.
तेल्हारा येथे वंचित बहुजन आघाडी भव्य संवाद दौरा.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती.

अकोला जिल्ह्यात तेल्हारा येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शना खाली भव्य संवाद दौरा संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका कार्यकारणी च्या वतीने वंचित च्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
अकोला जिल्हा परिषदच, पंचायत समिती,महानगर पालिका, नगर पालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निर्धार करण्यात आला.

या संवाद दौऱ्यास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य खतीब सैय्यद नातीकोद्दीन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, फुले-आंबेडकर विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.