सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा साजरा. वारकरी संप्रदायाच्या शेकडो दिंड्यांचा सहभागासह भाविकांची मांदियाळी.
सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा साजरा. वारकरी संप्रदायाच्या शेकडो दिंड्यांचा सहभागासह भाविकांची मांदियाळी.
सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा साजरा. वारकरी संप्रदायाच्या शेकडो दिंड्यांचा सहभागासह भाविकांची मांदियाळी.

वऱ्हाडची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील श्रीक्षेत्र सखारामपुर येथे शेकडो वारकरी दिंड्या दाखल झाल्या असून सखाराम महाराजांच्या नामघोषाने संत नगरी दुमदुमून गेली.

श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त १७ जानेवारीपासून विविध अध्यात्मिक कार्यक्रम दररोज सुरू असून वसंत पंचमी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त यात्रा महोत्सव सुरू असून मंदिर व परिसरात मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली आहे. विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आपली सेवा महाराजांच्या चरणी अर्पित करत आहेत. शेकडो वारकरी दिंडी फडावर हरिपाठ व किर्तन सुरू होत्या, यात्रेतभाविक महिला पुरुषांची हजारोच्या संख्येने गर्दी झाली होती. श्री चे दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे वस्तू विक्रीचे व्यापारी दुकाने, आकाश पाळणे, बच्चे कंपनी करिता अनेक प्रकारचे झुले व गर्दीने परिसर फुलून गेला , तसेच परिसरातील सर्व गावांमध्ये विवाहित मुली आपल्या माहेरी यात्रेनिमित्त आल्या असल्याने प्रत्येक घरी पाहुण्यांची वर्दळ दिसून येत होती.

सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय व उत्साही वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला. तीन दिवसाच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा तमाशा आर्केस्ट्रा सिनेमा टॉकीज येथे आढळत नाही या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदायाच्या शेकडो दिंड्यांचा सहभाग होता.

२२ तारखेला विविध भागांतून वारकरी आपल्या दिंड्या घेऊन सखारामपूर येथे दाखल झाले. २३ तारखेला मुख्य यात्रा उत्साहात पार पडली. तर २४ तारखेला काल्याच्या किर्तनानंतर वारकरी आपापल्या दिंड्यांसह आपल्या गावांकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

सखारामपूर संस्थानाला “वऱ्हाडची काशी” म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने एकत्र येत असून तीन दिवस विविध धार्मिक, सांप्रदायिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत सखाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून व आध्यात्मिक विचारांतून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सखारामपूर येथे हरीनामाचा भव्य सोहळा अनुभवायला मिळतो.

या संस्थानाची गादी सांभाळणारे गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाचा कारभार मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. तसेच अनेक वर्षांपासून होत असलेल्या या यात्रा महोत्सवासाठी गुरुवर्य गोपाळ महाराज व गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. २४ तारखेला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने यात्रा महोत्सवाची सांगता झाली.