महान देशभक्त नेताजी सुभाषचंद्रबोस यांची जयंती व देशसेवेत नियुक्त झालेल्या गुणवंताचा हृद्य सत्कार.
महान देशभक्त नेताजी सुभाषचंद्रबोस यांची जयंती व देशसेवेत नियुक्त झालेल्या गुणवंताचा हृद्य सत्कार.
महान देशभक्त नेताजी सुभाषचंद्रबोस यांची जयंती व देशसेवेत नियुक्त झालेल्या गुणवंताचा हृद्य सत्कार.

त्याकाळची ICS म्हणजे आजची UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन ही फक्त स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी, एका वर्षात मेहनतीने मीळालेल्या नोकरीचा राजीनामा देणारे, भारतीय स्वातंत्र्याचा लढा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे, नेताजी सुभाषचंद्र बोस आणी यांच्या सेनेमध्ये तेल्हारा तालुक्यातील एकमेव आझाद हिंद सैनिक वंदनीय पंढरीनाथ डामरे महाराज हे लढले.

युद्धभूमीवर युद्ध करताना जेव्हा खाण्यासाठी काही मिळत नव्हते तेव्हा प्रसंगी अनेक दिवस गवत खाऊन काढावे लागले. यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी , या राष्ट्रासाठी , आपल्यासाठी केलेल्या त्याग, समर्पणास, स्मृतीस वंदन व अभिवादनाचा कृतज्ञता सोहळा मागील अनेक वर्षांपासून युवाशक्ती संघटने द्वारा श्री गजानन महाराज मंदिर नाथ नगर तेल्हारा या ठिकाणी आयोजित केला जातो. सोबतच यावर्षी तेल्हारा तालुका व पंचक्रोशीतील सेनेमध्ये नव्याने भरती झालेल्या सैनिकांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी करण्यात आला. या मध्ये सत्कारमूर्ती प्रसाद प्रमोद अवचार CISF, अक्षय सुभाष ढोले CRPF, संकेत शेषराव घाटोळ CRPF ,सोमेश कैलास चव्हाण BSF , दत्ता उत्तम ढोले NPCI, अजय राजेश मानकर CISF, नागेश राजू जुंबळे CISF, ओम रोठे CISF, गीता डुब्बल BSF, नितीन केशव मानकर CISF, या सर्व तालुक्यातील गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक रुपेश चव्हाण व विशाल गावत्रे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक जायभाये, विजयकुमार डामरे, रेवस्कर सर, कोपरे सर, पारस्कर सर, दिनेश माकोडे , शिंगणे,गणेश राजुस्कर, लाटे, लाहोडे , प्रभाकर चतारे, श्रीकृष्ण वेलकर, संतोष टेकाडे, मयूर चोपडे, रोहित ठाकूर, शिवराज अहेरकर ,हरिदास चुंगडे, दीपक क्षीरसागर, अतुल वानखडे ,भूषण देशमुख, गोकुळ हिंगणकर ,विष्णू वारुळकर,अनिकेत बकाल, ओम खारोडे, दादू लाहोडे, उषा देशमुख, वंदना खारोडे, नम्रता लाहोडे, मयुरी वारुळकर, रश्मी देशमुख ,सानू लाहोडे, रेवस्कर इत्यादी उपस्थित होते .
सूत्रसंचालन अँड.आकाश बुरघाटे यांनी केले. देशभक्तीपर गीत हरिदास चुंगडे यांनी सादर केले. प्रास्ताविक भवानी प्रताप देशमुख यांनी केले .प्रा.सचिन थाटे , रेवस्कर सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.