बेलखेड येथे 20-21 मार्चला भव्य शंकरपट.,लाखोंच्या बक्षिसांची लयलूट.
बेलखेड येथे 20-21 मार्चला भव्य शंकरपट.,लाखोंच्या बक्षिसांची लयलूट.
बेलखेड येथे 20-21 मार्चला भव्य शंकरपट.,लाखोंच्या बक्षिसांची लयलूट.

बेलखेड – अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे भव्य शंकरपट आयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ व समस्त गावकरी यांच्या वतीने आराध्यदैवत मोठा मारोती यांच्या कृपाशीर्वादाने दि. 20-21 मार्चला आयोजित केले आहे. शंकरपट मध्ये लाखों रूपयांच्या बक्षिसांची लयलूट ठेवली आहे. तरी शंकरपट प्रेमी व नामांकित बैल धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बेलखेड ग्रामस्थ आयोजकांनी केले आहे.
बेलखेड येथील स्व. लीलाबाई मनोहरराव टोहरे यांच्या शेतात दि. 20-21 मार्चला आयोजित शंकरपटाचे उद्घाटन जिल्ह्याचे युवा खासदार अनुप धोत्रे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली व मतदारसंघ आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, जळगाव चे आमदार संजय भाऊ कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच
गजानन राठोड साहेब, ठाणेदार, हिवरखेड),राजु इंगळे साहेब (पि.एस.आय.पो.स्टे. तेल्हारा), नंदकिशोर उर्फ बाळासाहेब निमकर्डे, माजी उपसरपंच बेलखेड,गजानन उंबरकार, (मा.जि.प. सदस्य),संदिपदादा खारोडे, (मा.सभापती कृ.उ.बा.स.),रमेश दुतोंडे, (संयोजक अकोट विधानसभा), लखन राजनकार, (संचालक, कृ.उ.बा.स.), सतिष जयस्वाल,(नगर सेवक, न.प. तेल्हारा), कुलदिप तराळे, (युवा सहकार नेते),मंगेश ठाकरे, (नगरसेवक, न.प. तेल्हारा),राजाभाऊ टोहरे, (उपाध्यक्ष ख.वि.स. तेल्हारा), मोहनराव गोमासे, (मा. सरपंच, बेलखेड), सत्यशील प्र. सावरकर, (मा. उपसरपंच, बेलखेड),दिनेश नागपुरे, (अध्यक्ष, से. स. सोसायटी), श्रीकांत काळे (मा.सरपंच भांबेरी), पुरुषोत्तम उंबरकार भाईजी, समद मुल्लाजी, रामकृष्ण भटकर, अय्युब बादशाह, शेख कमरुद्दीन शेख नजमोद्दीन, अनिस भाई पठाण,रोहित नागपुरे, (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती),बाळुभाऊ राऊत,गोपाल सुधाकरराव टोहरे, संतोषसिंह ठाकुर, यासिन भाई कुरेशी, विशाल मलिये,डॉ राजेश तायडे, (पशु वैद्यकीय अधिकारी) विनोद उमाळे, (पशु चिकित्सक), शेख मजिद शेख हमजु, (मा.सदस्य) यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर शंकरपट स्पर्धा अ, क तसेच गावगाडा गटात होणार असून या साठी वेगवेगळ्या प्रकारची 1 लाख 80 हजार रुपयांची बक्षीसे राहणार आहेत. अ गटात 21 हजार पासून दहा बक्षिसे उतरत्या क्रमाने राहणार आहेत तसेच क गटात सुद्धा 21 हजार पासून उतरत्या क्रमाने एकुण 10 बक्षीसाची लयलूट होणार आहे. व गावगाडा गटात सुद्धा 11 हजार पासून बक्षीस राहणार आहेत. स्पर्धेत बैल जोडी प्रवेश फी अ गट एक हजार पाचशे, क गट एक हजार तसेच गावगाडा गटात पाचशे रुपये राहील.

शंकरपट प्रेमी व पट बैल धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जय हनुमान मंडळ व समस ग्रामस्थ शेतकरी बेलखेड यांनी केले आहे. शंकरपट स्पर्धा विविध शासनाच्या नियम व अटींच्या अधिनस्त राहतील त्यामुळे शंकरपट प्रेमी पट बैल धारकांनी खबरदारी घ्यावी. या शंकरपट मध्ये घड्याळ मालक उल्हासराव दाभाडे काम पाहतील.