श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे 2002 माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात. जुन्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी विद्यार्थीनी.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे 2002 माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात. जुन्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी विद्यार्थीनी.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे 2002 माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात. जुन्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी विद्यार्थीनी.

तेल्हारा –विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा अन तेथील आठवणी नेहमी मनात घर करून असतात याचा प्रत्यय दि 17 जानेवारी 2006 रोजी श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे एस एस सी बॅच 2002 माजी विद्यार्थी मेळाव्यात आला पुणे, नाशिक, जळगाव खान्देश, मुंबई,नागपूर, सुरत येथून हायस्कुल च्या मेळाव्यात जुन्या आठवणीत रमलेले दिसले. तब्बल 24 वर्षनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांना आनंद गगनाला मावेसा दिसत होता.

यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्याध्यापक गावंडे सर अध्यक्ष म्हणून प्रमुख उपस्थितीत माजी शिक्षक एस आर विखे, पिवाल सर, वानखडे सर,देशमुख सर, मथारीया सर, ढोले सर, यु पी विखे सर, तायडे सर, मोहोड सर, शहा बाबू,भारसाकळे सर,शांतीकुमार सावरकर सर,कराळे मॅडम, परनाटे मॅडम, वानखडे मॅडम ,भोअर सर, पवार सर, तेजराव कडू बाबू ,भाऊदेव भटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माजी विद्यार्थी च्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. 2002 बॅच मधील विद्यार्थी प्रवीण पंजाबराव ढोके हा तेल्हारा नगर परिषद निवडणूकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या बद्दल माजी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी पिवाल सर, मथरीया सर,विखे सर, देशमुख सर ,वानखडे सर ,गावंडे सर म्हणाले की विद्यालयाच्या जडणघडनित तसेच वाटचालीत माजी विद्यार्थ्यांच स्थान अत्यंत महत्वाचे आहे महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करीत असून त्यांनी विद्यालयाचे नाव उज्वल केलं आहे या मेळाव्याच्या आयोजना मुळे एक नवीन दिशा मिळणार आहे .यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात चांगले उपक्रम राबविण्याचे आवाहन केले, यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपआपले परिचय करून दिले 2002 पासूनचे 97 विद्यार्थी विद्यार्थीनी व 15 माझी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी एकूण 112 लोकांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शवित विद्यालयावरील आपले प्रेम व्यक्त केले. सोनू ढोले ,विद्या विखे, परमेश्वर इंगळे,जितू राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम नंतर स्वरूची भोजनाची व्यवस्था तथा सकाळ सत्रात नाश्ता, चहा ची व्यवस्था करण्यात आली होती,माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी दिवस भर गप्पा, विविध खेळ खेळत आपलं आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होते. कार्यक्रमाचे बहारदार संचालन माजी विद्यार्थी अफसर शाह अनवर शाह यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता सिसोदिया हिने केले कार्यक्रम चे यशस्वी करणे करिता प्रवीण ढोके, राजू यादव, विलास भटकर, अतुल धनभर, रुपेश गोरले,अफसर शाह ,कृष्णा टाले सहित माझी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.