जनहितार्थ तेल्हारा पालिकेने शास्ती अभय योजना राबवावी.
पाच नगरसेवकांची अध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी.
जनहितार्थ तेल्हारा पालिकेने शास्ती अभय योजना राबवावी.
पाच नगरसेवकांची अध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी.
तेल्हारा दि :- तेल्हारा नगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकी संदर्भातील शास्ती अभय योजना शासन निर्णयानुसार राबवून नागरिकांना दिलासा द्यावा व नगरपालिकेचे सुद्धा हित जोपासावे अशी मागणी ५ नगरसेवकांनी पालिका अध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांकडे १६ फेब्रुवारीला निवेदन देऊन केली आहे.
नगर परिषद तेल्हारा हद्दीतील अनेक नागरिकांवर मागील काही वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक नागरिकांना थकबाकी भरणे शक्य झालेले नाही. परिणामी नगर परिषदेची कर वसुलीही अपेक्षित प्रमाणात होत नाही. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नगरपालिका / नगरपरिषद स्तरावर थकबाकी वसुली वाढविण्यासाठी शास्ती अभय योजना शासन निर्णय क्रमांक एम यु एम- २०२५/ प्र.क्र.७० / न वि – १७ दि. १९मे २०२५ नुसार राबविण्यास परवानगी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत कराच्या शास्तीमध्ये सवलत देऊन नागरिकांना दिलासा देता येतो तसेच नगर परिषदेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.त्या अनुषंगाने नगर परिषद तेल्हारा येथे शास्ती अभय योजना राबविण्यात यावी या बाबत जनजागृती करून जास्तीत जास्त थकबाकी वसुली करण्यात यावी,सदर योजना राबविल्यास नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल व नगर परिषदेच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होऊन विकासकामांसाठी निधी उपलब्ध होईल व कुणावरही मालमत्ता जप्तीची वेळ येणार नाही.
सदर बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी पालीका अध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे न.प.सदस्या कान्होपात्रा रामभाऊ फाटकर ,सदस्य कैलास ठोकणे , राजेश खारोडे, सदस्या पंचफुला श्रीकृष्ण कवर ,रिना मुकेश आसरे यांनी केली आहे .