आपला जिल्हा अकोलानिवडणुक

तेल्हारा नगर परिषद विषय समिती सभापतीपदाची निवड अविरोध.- सचिन तायडे, विजयसिंह बलोदे,सतिश जयस्वाल, अमित अग्रवाल,साक्षी वानखडे, गायत्री सोळंके, रूपाली हागे यांची निवड. 

तेल्हारा : तेल्हारा नगर परिषद विषय समिती सभापती पदाची निवडणूक अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पार पडली. यामध्ये सहा सभापती व एक उपसभापती पदाची निवड करण्यात आली. तेल्हारा नगराध्यक्ष वैशाली जितेंद्र पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार तेल्हारा महेश रामगुंडे व त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी कामकाज पाहिले.

 तेल्हारा नगर परिषदेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रिया मध्ये स्थायी समितीच्या सभापती पदी नगराध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने त्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये उपाध्यक्ष सचिन तायडे यांची नियोजन व विकाससमिती सभापती पदी निवड करण्यात आली. बांधकाम समिती सभापती पदी विजयसिंह जयसिंह बलोदे यांची निवड करण्यात आली. स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी सतिष जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. पाणी पुरवठा व जलनिस्थारण समिती सभापती पदी अमित अग्रवाल यांची निवड करण्यात आली. शिक्षण व क्रीडा संस्कृतीक सभापती पदी सौ साक्षी वानखडे यांची निवड करण्यात आली आहे. सौ गायत्री सोळंके यांची महीला व बालकल्याण समिती सभापती पदी निवड करण्यात आली आहे. सौ रुपाली हागे यांची महीला व बालकल्याण समिती उपसभापती पदी निवड करण्यात आली आहे.

 सर्वप्रथम भाजपाचे गटनेता प्रशांत उर्फ अतुल विखे यांनी पक्षाकडून विविध समित्यांचे सदस्य पदाकरता ठराव मांडला त्यानंतर सभापती पदाकरता पक्षाकडून मिळालेल्या निर्देशाप्रमाणे गटनेता यांनी नाव सुचविले यामध्ये स्थायी समितीच्या सभापती पदी नगराध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने त्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक समिती सभापती सह सदस्य संख्या ठरविण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य गण उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!