आपला जिल्हा अकोला

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात बहुसंख्येने उपस्थित राहावे – माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांचे आवाहन.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात बहुसंख्येने उपस्थित राहावे - माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांचे आवाहन.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात बहुसंख्येने उपस्थित राहावे – माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांचे आवाहन.

अकोला : महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृ संघटना असलेल्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे ४४ वे वार्षिक अधिवेशन १८ व १९ एप्रिल रोजी उदगीर जिल्हा लातूर येथे आयोजित वार्षिक अधिवेशनात अकोला जिल्ह्यासह नागपूर, अमरावती विभागातील सर्व पत्रकारांनी बहूसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी केले आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, वृत्तपत्राचे प्रश्न, पत्रकारांच्या समस्या व आजची आधुनिक संसाधनासह सुरु असलेली गतिमान पत्रकारिता या विषयावर या अधिवेशनात चर्चा व प्रबोधन होणार आहे,

अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी आदी तालुका अध्यक्ष व सचिवांनी जिल्हा पत्रकार संघाशी संपर्क साधून नियोजन करावे अशी विनंती अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, सह चिटणीस संजय खांडेकर,विजय शिंदे,सत्यशील सावरकर, दिपक देशपांडे , उपाध्यक्ष रामदास वानखडे, दिलीप देशमुख यांनी केली आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!