सर्वधर्मांचा जीव -प्राण असलेल्या “हिंदू” धर्म, संस्कृती रक्षणार्थ एक व्हा : ह भ प शुकदास महाराज गाडेकर यांचे प्रतिपादन. बेलखेड येथे विराट हिंदू संमेलन संपन्न.
सर्वधर्मांचा जीव -प्राण असलेल्या "हिंदू" धर्म, संस्कृती रक्षणार्थ एक व्हा : ह भ प शुकदास महाराज गाडेकर यांचे प्रतिपादन. बेलखेड येथे विराट हिंदू संमेलन संपन्न.
सर्वधर्मांचा जीव -प्राण असलेल्या “हिंदू” धर्म, संस्कृती रक्षणार्थ एक व्हा : ह भ प शुकदास महाराज गाडेकर यांचे प्रतिपादन. बेलखेड येथे विराट हिंदू संमेलन संपन्न.

धर्म लयाला जातो म्हणून दृष्टांचा नाश, सज्जनांचे रक्षणार्थ सर्व धर्माचा ‘जीवप्राण’ असलेल्या मानवतावादी हिंदू धर्मातील बंधू आणि भगिनींनो जागे व्हा. समजा, जागवा. मेरे प्यारे भारत को, दुश्मन की नजर ना लगे. यासाठी चारित्र्य, नीती, स्वावलंबी, निर्व्यसनी बना. मानवता जागृत करा,अमलात आणा.असे प्रतिपादन बेलखेड येथे श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात आयोजित विशाल हिंदू संमेलनात शनिवारी दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी अ .भा. गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथील प्रचारक हभप शुकदास महाराज गाडेकर यांनी प्रमुख वक्ता म्हणून केले.

विशाल हिंदू संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्रीधरराव टोहरे हे होते. तर हभप शुकदास महाराज, शक्ती सभा संस्थापिका सामाजिक कार्यकर्त्या स्वयं सुरक्षा प्रशिक्षिका आर्यविरा हर्षिता मानकर (मध्य प्रदेश), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला विभाग सहकार्यवाह सुनील जाधव इत्यादी प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी संत गजानन महाराज मंदिरात पूजा अर्चना करून नमन केले. तर मंचावरील भारत माता प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व पुष्पार्पणही केले. भारत माता व संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची सामूहिक आरती झाल्यावर सर्वश्री टोहरे, जाधव, हिंदू संमेलनाचे संयोजक विलास साखरे यांचे गजानन वसे, अरुण टोहरे, प्रवीण उंबरकार यांनी पुष्पगुच्छाने स्वागत केले . ह भ प गाडेकर महाराज, हर्षाताई मानकर यांचे बाळासाहेब निमकर्डे ,कल्पनाताई खुमकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छाने स्वागत केले. प्रास्ताविक, परिचय सूत्रसंचालन गजानन लासुरकार यांनी केले.

हिंदू संस्कृतीत कुटुंब हा समाजाचा पाया होय,कुटुंब व्यवस्थेत दिसणाऱ्या कमतरता दूर करण्यासाठी कुटुंब प्रबोधन आवश्यक आहे. ते समाज आणि राष्ट्र निर्मितीचा सर्वात महत्त्वाचा घटक असून भारतीय संस्कृतीत कुटुंब हा समाजाचा पाया आहे. हिंदू धर्म, संस्कृतीचे रक्षण कुटुंबातील संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या तत्त्वावर आधारित आहे. हिंदू संस्कृती जिवंत राहण्यासाठी कुटुंब प्रबोधन अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन हर्षाताई मानकर यांनी आपल्या मुख्य जोशपूर्ण उदबोधनात केले.
आपला संतांचा, शिवाचा, कालीमातेचा, शूरवीरांचा धर्म आहे. आपण एकतेपासून, वेदांच्या विचारांपासून दूर गेल्यामुळे अधर्म वाढत आहे. आपल्या डोळ्यादेखत होणारा अन्याय आपण मुखदर्शक बनून का पाहतो? मुली तलवारीच्या धारेप्रमाणे असायला हव्या. आपले कर्म सुधारा, जातीपातीला तिलांजली देऊन विमर्श, राष्ट्रवादावर चर्चा करा, तर्क, प्रतिवाद करा. राष्ट्राचे कल्याण होईल. असा विश्वास व्यक्त करून जात पात को करो बिदाई- हिंदू हिंदू भाई भाई या घोषणेने हर्षा ताईंनी आपल्या उद्बोधनास विराम दिला.
आपला धर्म तोडण्यासाठी अनेक शक्ती टपून बसल्या आहेत. त्यामुळे हिंदू धर्म रक्षणासाठी संघटित व्हा. स्वहित, देशहित लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला पंचपरिवर्तनाचा मार्ग अंगीकारून देशाच्या प्रगतीत हातभार लावा. बलहीनोको नही पूछता, बलवानो को विश्वपुजता हा भाव लक्षात घेऊन संघ कार्याला सहयोग द्या.असे प्रतिपादन सुनील जाधव यांनी यावेळी केले.
मातृशक्तीसह आबालवृद्ध हिंदूबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.अकोला जिल्हा सहकार्यवाह रामदास घावट यांनी आभार प्रदर्शन केले. सामूहिक राष्ट्रवंदना गायनाने विशाल हिंदू संमेलनाची सांगता झाली. शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.