तणावमुक्त जीवन शैली करिता ब्रह्माकुमारीज परिवारा तेल्हारा कडून सात दिवशीय प्रवचनाचे उद्घाटन.
प्रवचनकार राजयोगिनी ब्रह्माकुमारी राखी दिदी यांचे सात दिवसाचे व्याख्यान.
तणावमुक्त जीवन शैली करिता ब्रह्माकुमारीज परिवारा तेल्हारा कडून सात दिवशीय प्रवचनाचे उद्घाटन.
छ्तीसगड बिलासपूर ब्रह्मकुमारीज परिवारातील प्रवचनकार राजयोगिनी ब्रह्माकुमारी राखी दिदी यांचे सात दिवसाचे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विचारांची पेरणी करणारे प्रवचन.

प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हारा जिल्हा अकोला द्वारा आयोजित तणावमुक्त जीवन,सफलता के साथ कदम या विषयावर पाच फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते साडेसात वाजेपर्यंत विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.

छ्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील ब्रह्मकुमारीज परिवारातील सुप्रसिद्ध प्रवचनकार राजयोगिनी ब्रह्माकुमारी राखी दिदी यांचे सात दिवसाचे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विचारांची पेरणी करण्यासाठी प्रवचन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सध्या परिवारातील अगदी लहान बालकांपासून तर वृद्धापर्यंत तणावग्रस्त झाले आहेत.

शारीरिक व्याधी किंवा बिमारीचा इलाज तज्ञ् डॉक्टर्स कडून केला जाऊ शकतो परंतु मनाशी संबंधित इलाज केवळ आध्यत्मिक ज्ञानामुळेच होतो त्यासाठी प्रत्येकाला ही प्रवचनमाला उपयुक्त ठरणार आहे.
5 फेब्रुवारी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता स्थानिक गजानन नगर स्थित ब्रह्माकुमारीज ओम शांती भवनात या कार्यक्रमाचे छानदार उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी नगर परिषद नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.


वर्तमान काळात अनेक समस्यानी ग्रासलेले असताना या समस्यांचे निरसन करण्यासाठी राजयोग जाणून घेणे आवश्यक आहे. अध्यात्मक ज्ञान माणसाचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदी राहण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तेल्हारा वासियांनी दि. 5 ते 11फेब्रुवारी दरम्यान सातही दिवस उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन तेल्हारा ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांनी केले आहे.