राज्यातील अनेक जिल्हा, तालुका पत्रकार संघ पत्रकारांच्या हितासाठी, त्यांच्या ऐक्यासाठी तर काम करीत असतातच त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आपल्या भागाच्या विकासासाठी, समाजासाठी कार्य करतात त्यांचा गौरव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद करीत आहे – एस. एम देशमुख.,कर्जत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन.
राज्यातील अनेक जिल्हा, तालुका पत्रकार संघ पत्रकारांच्या हितासाठी, त्यांच्या ऐक्यासाठी तर काम करीत असतातच त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आपल्या भागाच्या विकासासाठी, समाजासाठी कार्य करतात त्यांचा गौरव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद करीत आहे - एस. एम देशमुख.,कर्जत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन.
राज्यातील अनेक जिल्हा, तालुका पत्रकार संघ पत्रकारांच्या हितासाठी, त्यांच्या ऐक्यासाठी तर काम करीत असतातच त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आपल्या भागाच्या विकासासाठी, समाजासाठी कार्य करतात त्यांचा गौरव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद करीत आहे – एस. एम देशमुख.,कर्जत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन.

राज्यातील पत्रकार तथा जिल्हा, तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम मोठे आहेत. पत्रकारांबद्दल कोणी कितीही नाकं मुरडू देत,एक वास्तव कोणी नाकारू नये..महाराष्ट्रातील अनेक तालुका पत्रकार संघ पत्रकारांच्या हितासाठी, त्यांच्या ऐक्यासाठी तर काम करीत असतातच त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आपल्या भागाच्या विकासासाठी, समाजासाठी कार्य करताना दिसतात.. कुठे रक्तदान शिबिरं , कुठे वृक्षारोपण, कुठे प्रदूषण विरोधी चळवळ, गावातील अतिक्रमण विरोधी मोहिमा आदि बरोबरच गाव दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वागिण विकास करण्याची जबाबदारी पत्करलेली काही तालुका, जिल्हा पत्रकार संघ आहेत.

राज्यातील रायगड प्रेस क्लबनं मुबई – गोवा महामार्गासाठी गेली पंधरा वर्षे सलग चळवळ चालवून ती यशस्वी करून दाखविली, मुरूड तालुका पत्रकार संघानं जंजिरा मुक्ती दिन शासकीय स्तरावर साजरा करावा यासाठी शांततेच्या मार्गानं पाठपुरावा सुरू ठेवलाय.. रत्नागिरी तालुका पत्रकार संघ असेल, किंवा संग्रामपूर तालुका पत्रकार संघ असेल यांनी गावं दत्तक घेऊन त्या त्या गावच्या विकासाची जबाबदारी पत्करली..मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या काळात काही तालुका संघ शेतकरयांच्या मदतीला धावून आले.. गावागावात जाऊन गरजूंना मदत केली..

ही सारी पत्रकारांची कामं आहेत का? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर मी ठामपणे सांगेल की, हो समाजासाठी योगदान देणं हे समाजाचा एक घटक या नात्यानं पत्रकारांचं आणि त्यांच्या संघटनेचं कामच आहे..मला आनंद आहे सामाजिक जाणिवेतून पत्रकार संघ ही कामं करतात.. मात्र माध्यमात असताना देखील पत्रकारांची, संघटनांची ही काम जनतेपर्यंत पोहोचतच नाहीत.. त्यांच्या कामाचं कौतूक ही होत नाही.. मला जेव्हा या वास्तवाची जाणीव झाली तेव्हा, सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांचा राज्यस्तरावर गौरव करायचा निर्णय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेनं घेतला.. प्रत्येक महसूल विभागातून एक तालुका पत्रकार संघ आणि राज्यातून एक जिल्हा संघ निवडून त्यांचा गौरव करायचा अशी ही कल्पना.. ग्रामीण पत्रकारांसाठी सातत्यानं कार्य करणारे वसंतराव काणे आणि संचारकार पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या नावानं दहा वर्षांपुर्वी ही पुरस्कार योजना सुरू झाली..
पहिला कार्यक़म नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.. त्यानंतर पाटण, गंगाखेड, वडवणी, अक्कलकोट, कर्जत (अहिलयानगर) बोर्डी (पालघर) माहूर, सेलू, आदि ठिकाणी हे पुरस्कार वितरण सोहळे पार पडले.. यंदा रायगड जिल्ह्यात कर्जत येथे गौरव सोहळा दणक्यात पार पडला..काल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, आयबीएन मराठीचे संपादक मंदार फणसे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते चामोर्शी (गडचिरोली) बेला (नागपूर) अंबाजोगाई (बीड) पळूस (सांगली), मनमाड (नाशिक) पनवेल (रायगड) संग्रामपूर (बुलढाणा) आंबेगाव (पुणे) किनवट (नांदेड) मुंबई उपनगर आदि पत्रकार संघाना गौरविण्यात आले..राज्यभरातून 800 पत्रकार सोहळयास उपस्थित होते..
कर्जत प्रेस क्लबने आयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती.. अत्यंत दिमाखात सोहळा पार पडला. माझ्या सह परिषदेचे पदाधिकारी तसेच पाहुणांचं गावाच्या वेशिवर स्वागत करून उघड्या जीपमधून मिरवणूक काढत आम्हाला सभास्थानी आणलं गेलं.. आलेल्या पाहुण्याचं स्वागत, आदरातिथ्य, भोजन व्यवस्था सारं काही जबरदस्त होतं.. सोहळा यथासांग पार पडला.. माझ्या आयुष्यातील कालचा दिवस अविस्मरणीय होता.. परिषदेला आम्ही कुटुंब मानतो.. कुटुंबात दिसणारा जिव्हाळा, आपलेपण, प्रेम हे सारं कर्जत मध्ये दिसलं.. पुरस्कार वितरण सोहळा कमालीचा यशस्वी झाला..संजय मोहिते, दर्वेश पालकर आणि कर्जत प्रेस क्लबच्या टिमनं पंधरा दिवस मेहनत घेतली.. हे सारे माझे मित्र आहेत, त्यांचे आभार मानले तर त्यांना आवडणार नाही, पण कर्जतकर मित्रांनो, एक सांगतो, तुमच्या सारखे कट्टर कार्यकर्ते परिषदेजवळ आहेत हेच परिषदेच्या यशाचं गमक आहे.. तुम्हा सर्वांची परिषदेला कायम गरज असणार आहे असेही मराठी पत्रकार परिषद चे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी म्हटले आहे.